दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : आज सोमवार उत्पत्ती एकादशी निमित्त माऊली मंदिरात संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
श्रीक्षेत्र देहू येथून अलंकापुरी नगरी कडे दिंड्यांचा ओघ पहाटेपासून विठू नामाचा गजर करीत, माऊली माऊलीचा जयघोष मुखी घेत अखंड पायवाट सुरू होती.
पहाटे माऊली मंदिरात नित्याचे धार्मिक कार्यक्रम होऊन दुपारी श्रींना नैवेद्य देण्यासाठी अर्धा तास दर्शन बंद करण्यात आले होते रात्री पालखीची नगर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली, त्यात आणखी भर म्हणून वऱ्हाडी मंडळींनी अलंकापुरी नगरीत निरनिराळ्या भागातून हजारोंच्या संख्येने आलेल्या मंडळींनी देखील गर्दी केली होती. सहाजिकच यामुळे ठिक ठिकठिकांच्या चौकात वाहतूक कोंडी जाणवत होती. संपूर्ण दिवसभर आळंदी शहरात भाविक इंद्रायणी घाट व इतर देवदेवतांची मंदिरे दर्शणार्थ तुडुंब भरली होती. आज आळंदी शहरांमध्ये विविध ठिकाणी विविध व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना देखील चांगला धंदा झाला असल्याचे काही व्यवसायिक सांगत होते. वाहतूक विभागाला देखील अधिकचा नफा मिळाल्याचे वाहतूक विभागाकडून कळाले.