ऋषी सहारे
संपादक
आरमोरी…..
विद्यार्थ्यांची शैशनिक गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थांना मिळणाऱ्या ऑनलाईन सुविधा मिळण्यासाठी विद्यापीठाने UGC च्या मार्गदर्शनात ABC account काढण्यासाठी विद्यापीठाने दिलेल्या सूचनानुसार सर्व केंद्रप्रमुखांनी काम करून मुक्त विद्यापीठाला Naac ची A Grade मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे … असे आवाहन प्रा.डॉ.सचिनभाऊ खोब्रागडे यांनी आयोजित आढावा बैठकीतून केले.
ते यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नागपूर अंतर्गत येणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख ,केंद्रसयोजक यांच्या आयोजित आढावा बैठकीच्या अधक्ष्य पदावरून बोलत होते .कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानी विभागीय संचालक डॉ.इंगळे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर कार्यालयाच्या सहाय्यक फुके मॅडम,तांत्रिक सहाय्यक अम्रीत सिंग सर ,डॉ. भगत सर होते.
डॉ.इंगळे सर यांनी संबोधन करताना सातत्य आणि परिश्रम महत्वाचे असल्याचे नमूद केले. सदर आढावा बैठक श्री.किसनराव खोब्रागडे महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.
कार्यक्रमाचे संचालन.प्रा. अमरदिप मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. हलमारे सर यांनी केले ..कार्यक्रमाला गड चिरोली जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख, केंद्र संयोजक,केंद्र समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशवितेकरिता प्रा.बंसोड,प्रा. वाढई,प्रा. नरुले तथा सर्वांनी अथक परिश्रम घेतले.