दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेलं श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे ऐतिहासिक आणि पुरातन असे वैशिष्ट्यपूर्ण असलेले जलकुंड जोपासणे व जलकुंडांना पुर्वप्रतिष्ठा मिळावी यासाठी आळंदीकरांनी प्रयत्न करावे असे आळंदी येथील इतिहास संशोधक ॲड.नाझीम शेख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. आळंदी येथे प्रमोद मांडे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर भटकंती कट्टा आयोजित आळंदी एक पुरातन नगर ऐतिहासिक वारसा सहलीचे (हेरिटेज वाॅक) आयोजन आळंदी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांच्या माध्यमातून करण्यात आले.

आळंदी हे एक प्राचिन नगर असून त्रेता युगापासून ही नगरी असल्याचा दावा आळंदी येथिल इतिहास अभ्यासक अॅड.नाझीम शेख यांनी केला. त्यांनी युगानुयुगे ही प्राचिन नगरी अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे या हेरिटेज वाॅक च्या दरम्यान सादर केले.आजही आळंदीमध्ये अतिप्राचिन असे जलश्रोताचे जवळपास २२ कुंड उपलब्धु असून त्यापैकी १३ कुंडांचा शोध घेण्यात अॅड.नाझीम शेख हे यशस्वी झाले आहेत.यावेळी शेख यांनी सदर जलकुंडाचे महात्म्य त्यांनी विस्तृत स्वरूपात सांगितले. आळंदी येथे भागिरथी, मणिकर्णिका आणि कुबेरगंगा या नद्यांचे उगम आहेत.म्हणून आळंदी हे त्रिवेणी संगम असलेले तीर्थ म्हणून पुराणकाळात प्रसिद्ध असलेले नगर होते.

आळंदी नगरीचा हा अतिप्राचिन परंतू अप्रकाशित आणि दुर्लक्षित वारसा जगापुढे यावा, यावर आवश्यक ते शास्रोक्त संशोधन व्हावे अशी अपेक्षा ते वारंवार व्यक्त करताना दिसतात. ते अवर्जून सांगतात की मी या मातीचा पुत्र आहे आणि या आळंदीच्या मातीचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. यामाध्यमातून आळंदीची खरी ओळख जगापुढे आणण्यासाठीच मी सदैव प्रयत्नशील आहे.माझ्या मातृभूमीची या माध्यमातून एकार्थाने सेवा करून उपकृत होण्याचा माझा प्रयत्न असेल असे शेख यांनी सांगितले आहे.

आळंदी ही संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतार काळापूर्वीच एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि या नगराचे गतवैभव मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध असून या कामी मला आळंदीचे मा.उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांचे सर्वोतोपरी सहकार्य मिळत आले आहे.असे ही ते अवर्जून सांगत होते. या ऐतिहासिक वारसा सहलीचे आयोजन मा.उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी केले. याप्रसंगी जेष्ठ इतिहास अभ्यासक, मोडिलिपीतज्ञ ब.हि.चिंचवडे, इतिहास अभ्यासक निलेश गावडे, इतिहास अभ्यासक संतोष घुले,जितेंद्र आबा माळी,रतनजी इंगवले, मल्हारजी दुधाळ,रविराज फुगे यांच्यासह अविरत श्रमदान संस्थेचे सदस्य,गडकिल्ले सेवा संस्थेचे सदस्य आणि उदयभाऊ गायकवाड युथ फाउंडेशनचे सदस्य ही मोठ्या संखेने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com