ऋषी सहारे
संपादक
67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्रातील निवडणूका दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पाडणारआहेत. त्यानुषंगाने, आरमोरी 67 विधानसभा क्षेत्रातील एकुण 310 बुथवर निवडणुक प्रकिया पार पाडणार आहे.
त्याकरीता आज दिनांक 18/11/2024 रोजी 39 बुध निहाय पथक हेलीकॅप्टरद्वारे व 91 पथक बस आणि इतर वाहनाने आपले शासकिय कर्तव्य पार पाडण्याकरीता रवाना झालेली आहेत.
मतदान कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याकरीता व त्यांना प्रोत्साहन देण्याकरीता निवडणूक निरीक्षक विनीतकुमार (भा.प्र.से.) व निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी श्रीमती मानसी, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी कुरखेडा हे देसाईगंजच्या तालुका क्रिडांगण येथील हेलीपॅडवर हजर होते.
यावेळी क्षेत्रिय अधिकारी व मतदान अधिकारी यांचे गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले. मतदान अधिकारी हे खुप उत्साही होते व त्यांनी या आधीचे निवडणुकीचे अनुभवसुद्धा व्यक्त केले.
प्रत्येक नागरीकाने सहभाग दर्शवून संपुर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्याकरीता सहकार्य करावे. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी यांनी केले आहे.