दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चिमूर तालुक्यातंर्गत मौजा सावरगाव येथे आज सकाळी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पर वोट एक हजार रुपया प्रमाणे बंद लिपाफ्यात रुपये दिले गेले असल्याने खडबळ उडाली आहे.
मौजा सावरगाव येथील आकाश विजय गोसवाडे यांच्या घरी पर व्यक्ती १ हजार रुपयांचा सफेद रंगाचा बंद लिफापा भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला असल्याचा,त्याचा स्वतःचा व्हिडिओ शोसल मिडियावर घुमतो आहे.
व्हिडिओ धारकांचे नाव आकाश विजय गोसवाडे असून त्यांच्या घरी,चिमूर तालुकातंर्गत मौजा सावरगाव येथील स्थानिक भाजपाचे पदाधिकारी असलेले अरुण नाकाडे आणि शंकर काळे यांनी एक हजार रुपयांचा बद लिपाफा दिला असल्याचे आकाशचे म्हणणे आहे.
मतदारांना रुपये देऊन मते खरेदी करण्याचा प्रकार गंभीर असून सदर गंभीर प्रकरणाची इत्यंभूत माहिती चिमूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किशोर घाडगे तात्काळ घेतील काय?
याचबरोबर अशाच प्रकारच्या रुपयांची पाकिटे प्रत्येक गावात वाटण्यात आली आहेत काय? याबाबत सुध्दा सखोल चौकशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि सर्व संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली पाहिजे असा सुर चिमूर मतदारसंघातील मतदारांत आता उमटू लागला आहे.