आमच्या देशाचा……
स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947…
संविधान दिन 26 नोव्हेंबर 1949…
प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950…
महाराष्ट्र दिन ( कामगार दिन ) 1मे 1960…
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर 1948..
वरील सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक उत्सव मुळासहित कायम टिकवून ठेवण्याच्या जबाबदारीचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस (20/11/2024 ).”
पाच वर्षातून एक दिवस, त्या दिवसातील रांगेतला एक क्षण माझ्या शारीरिक आणि मानसिक,माझ्या पत्नी व कुटुंबाचे,माझ्या रक्ताच्या नातेवाईकांचे,माझ्या समाजाचे,माझ्या राज्याचे,माझ्या देशाचे,पर्यायाने माझ्या विश्वाचेच नव्हे तर,माझ्या संपूर्ण सजीव सृष्टीचे आरोग्य कायमस्वरूपी मिळवून घेण्याचा तो क्षण!
ज्याप्रमाणे नैसर्गिक अपघात क्षणात होतात.आपण रस्त्याने चालतांना,मोटार सायकलवरून जातांना,पावसात वीज कडाडताना,अचानक नागाच्या शेपटीवर पाय पडल्यावर.क्षणात आमचा जीव निघून जातो!
बरं याची पूर्वकल्पना आपल्याला असते का हो.
अजिबात नसते. तशी पूर्वकल्पना असती तर हे अपघात घडलेच नसते!
परंतू,उद्याच्या ( 20/11/2024) च्या प्रत्येक क्षणात आपण चुकीचे EVM चे बटण दाबले की आमचा अपघात,आत्मघात किंवा आमचे जीवन उध्वस्त होणार आहे.हे आम्हाला पूर्वकल्पनेने समजलेले असतांना आम्ही चुकीचे बटण का दाबायचे?
हा क्षण किती महत्वाचा आहे,याचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर स्वतःला प्रश्न विचारा प्रधानमंत्री सुद्धा तुम्हाला तुमचे मत मागायला भिकारी होऊन येतो.जे पाच वर्षे कधी तोंड दाखवत नाहीत,ज्याला भेटण्यासाठी तुम्हाला रांगेत उभे राहून त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते तो भिकारी तुमच्या दारी येतो.तुम्हाला दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊन नमस्कार करतो. प्रसंगी 100/-, 500/-, 1000/-,5000/-, 10000/- रुपये सुद्धा देतो.ते केवळ “त्या ” क्षणात तुम्ही तुमचा स्वतःचा आत्मघात किंवा अपघात करावा म्हणून…
एवढा महत्वाचा तो क्षण आहे…
या क्षणात अपघात आणि आत्मघात होणारच नाही याची काळजी घेऊनच कोणतेही बटण दाबा…
त्या क्षणी सर्व विसरून जा, केवळ एकच लक्षात ठेवा की या क्षणातील जबाबदारीच्या कर्तव्याने वरील सर्व बाबींचे कल्याण होणार आहे…
कारण,आम्हाला ज्या महागायीच्या,बेरोजगारीच्या,आतंकवादाच्या,जगता – जगता मरण्याच्या आणि मरता – मरता जगण्याच्या,आमच्या माता भगिनीच्या शील संरक्षणाच्या यातना भोगाव्या लागतात.त्या यातना जगाच्या वेशिवर टांगण्याचा तो उद्याचा क्षण आहे.
याची जाणीव ठेऊन EVM चे बटण दाबा…
दुसऱ्या बाजूला या EVM वरच मतदान घेऊन या व्यवस्थेने आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतलेला आहे.ही एक टांगती तलवार आमच्यावर आहेच.
ज्याप्रमाणे हरियाणाच्या निवडणुका पार पडल्या,नरेंद्र मोदींनी एकही सभा घेतली नाही. अमित शहाने सुद्धा रॅलीचे आयोजन करुन सुद्धा काढता पाय घेतला.ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदी परदेश दौऱ्यावर गेले.तेथील स्थानिक नेत्यावर निवडणुकीची सर्व जबाबदारी टाकली. EVM ला सेट करुन बिनधास्त राहिले. हरियाणात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वारे वाहत असतांना पुन्हा EV M उघडल्याबरोबर भाजपचे सरकार सत्तारुढ झाले!
अगदी असेच प्रयत्न महाराष्ट्रात घडत आहेत.ऐन निवडणुकीची प्रचार यात्रा अर्धवट सोडून रविवारी मणिपूर परिस्थितीचे कारण सांगून निघून जातात ( जेंव्हा मणिपूरमध्ये दीड वर्षांपूर्वी आगडोंब उसळला होता,तेंव्हा कुठेच निवडणुका नसतानाही कधी मणिपूरला का गेले नाही?).प्रधानमंत्री मोदी सुद्धा 5 दिवस अगोदरच नायजेरियाला निघून जातात,इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रचार रस्त्यावर उतरून चालू असतांना,भाजपच्या वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपवली आणि सर्वजण निघून गेले.
हे सुतोवाच हरियाणासारखे नाही का?
हे EVM चे सेटिंग तर नसेल ना!
आणि जेंव्हा 23/11/2024 ला EVM उघडल्या जातील आणि हरियाणाप्रमाणेच निकाल जर आलेच…..
तर मग एक निक्षुन सांगतो की आपल्याला पुढील काळात या EVM ला कायमचे मातीत गाडण्यासाठी देश पातळीवर रान उठवावे लागेल….
परंतू ,सध्या उद्या ( 20/11/2024 ) तरी EVM चे योग्य बटण दाबून त्या “क्षणाचे “सोने करण्याचा प्रयत्न करू…
तेंव्हाच आमच्या जीवनाचे खरे औक्षण होईल…
*****
टीप :- ही पोस्ट जास्तीत जास्त व्हायरल करा….