
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाला लोळवत आस्ट्रेलिया संघ साहाव्यांदा वनडे क्रिकेट वर्ल्डकप चांम्पियन ठरला आहे.
जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष आजच्या अंतिम सामन्याकडे लागले होते.वर्ल्ड कप भारत जिंकणार की आस्ट्रेलिया जिंकणार याची चर्चा जागोजागी होती.मात्र आस्ट्रेलियाने अंतिम सामना जिंकून आम्हीच नंबर वन आहोत हे दाखवून दिले.
भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकावा यासाठी भारत देशांतर्गत जागोजागी हवन,पुजन करण्यात आले होते व हवन पुजन अंतर्गत भारतीय संघाप्रती मनोकामना व्यक्त केल्या होत्या.
मात्र,खेळ हा खेळ असतो व जो संघ चांगला खेळेल तोच संघ विजयी होतो हे आज आस्ट्रेलिया संघाने परत एकदा दाखवून दिले.
आस्ट्रेलिया संघाने ४ विकेट गमावली व २४१ धावांचे लक्ष पुर्ण केले.