
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
१० देशांतर्गत क्रिकेटच्या टीमने विश्वकप मध्ये सहभाग घेतला होता.अनेक फेऱ्यानंतर भारत व आस्ट्रेलियाच्या संघाने वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे.
भारत देशांतर्गत गुजरात राज्यातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वकप वनडे क्रिकेटच्या अंतिम सामन्याला आज २ वाजता सुरुवात होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाने चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे तर आस्ट्रेलिया संघाने आठव्यांदा अंतीम फेरी गाठली आहे.दोन्ही देशांचे वनडे क्रिकेट संघ वर्ल्ड कपचे मजबूत दावेदार आहेत.
भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड व कप्तान रोहित शर्मा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तयारीत आहेत तर आस्ट्रेलिया संघाचे कोच जस्टिन लैंगर व कप्तान आरोन फिंच हे सुध्दा वर्ल्डकपचा जगज्जेता ठरण्यासाठी रणनीतीत यशस्वी आहेत.
जगभरातील करोडो क्रिकेट प्रेमींचे आज होणाऱ्या भारत-आस्ट्रेलिया वनडे लढतीकडे लक्ष लागले आहे.मात्र भारत व आस्ट्रेलिया देशातील नागरिक आमचाच संघ वर्ल्ड कप चांम्पियन होणार या उमेदीत आहेत.
अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम १ लाख ३० हजार प्रेक्षक क्षमतेचे आहे.आज हे स्टेडियम खचाखच भरलेले असेल.