बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपूर प्रतिनिधी
इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्ष तालुका अध्यक्षपदी संतोष हरिभाऊ सुतार (पिंपरी बुद्रुक, ता.इंदापूर) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे, आचार विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. तसेच सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आरोग्य बाबत सर्वतोपरी मदत करावी असे संतोष सुतार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदावर गाव पातळीवर काम करत आसताना पक्षाने तालुकास्तरावर सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आरोग्याची सेवा करण्याचे भाग्य मला मिळवून दिले आहे. त्याचा मी पुरेपूर उपयोग करून सर्वांना मदत करेन असे निवडी प्रसंगी संतोष सुतार यांनी बोलताना सांगितले.
याप्रसंगी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकाळ शुभम निंबाळकर, माजी सरपंच श्रीकांत बोडके, नामदेव बोडके, सरपंच प्रतिनिधी सुदर्शन बोडके, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.