युवराज डोंगरे/खल्लार
आंबेडकरी रिपब्लिकन अनुयानांना एकसंघीय राहण्याचा संदेश घेऊन दि 1 नोव्हेंबर पासून अचलपूर(जि अमरावती) येथील पवित्र दिक्षाभूमीवरुन पिपल्स रिपब्लिकन पार्टी द्वारा रिपब्लिकन जोडो भाईचारा रखो या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.
अमरावती जिल्ह्यातील सर्व सर्कल मधिल गाव तालुका पातळीवरील सभा, बैठका आदींचे आयोजन करुन त्याद्वारे आंबेडकरी रिपब्लिकन अनुयानांना एकसंघीय राहण्याचा संदेश देण्यात येत आहे.
या अभियानाचे दि 18 नोव्हेंबरला सायंकाळी खल्लार येथे स्वागत करण्यात करण्यात आले असुन अभियानात पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, दर्यापूर पं स माजी उपसभापती रामेश्वर इंगळे यांच्यासह रविंद्र आठवले, दुर्योधन खंडारे,गजानन खंडारे, देवेंद्र मोहोड, राजु खंडारे, बालवीर खंडारे, अमरदिप इंगळे, व इतर मंडळी उपस्थित होते.