नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली -नवजीवन विद्यालय व जुनिअर कॉलेज जमनापूर/साकोली येथे माजी. पंतप्रधान इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांची जयंती सयुक्त रित्या साजरी करण्यात आली त्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे मुख्याध्यापक डॉ. लोकानंद नवखरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बाबुरावजी लंजे ,सौ. अलका गोंधळे ,अमोल वाकडे सौ. अर्चना नवखरे उपस्थित होते त्याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ. नवखरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजच्या काळातही खूप प्रेरणादायी आहेत. दरवर्षी भारत सरकार राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने स्त्री-शक्ती पुरस्कार प्रदान करत असतो. त्यांचे विचार आत्मसात केले तर जीवनामध्ये यशस्वी होता येईल असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना नवखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ अलका गोंधळे यांनी केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल वाकडे , अशोक मीना व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News