नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई जमनापुर/साकोली येथे शिष्यवृत्ती परिक्षेचे प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य मा. मुजम्मिल सय्यद, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, विनोद किरपान व सतिश गोटेफोडे उपस्थित होते.
वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर द्वारा संचालित नवजीवन सीबीएसई साकोली येथिल वर्ग ५ वी मधून ६ व वर्ग ८ वी मधून ३ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ मध्ये पात्र झालेले आहेत. या मध्ये मिसिका अग्रवाल, आलिया शेख, काव्या गोडसे, श्रुती रंगारी, श्रावस्थी वालदे, मृनाल बारसागडे ५ व्या वर्गातून तर तेशिका रिनाईत, स्वस्तिक व्यास व तनिष्क भावे ८व्या वर्गातून उत्तिर्ण झालेत. या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य मा. मुजम्मिल सय्यद यांनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देउन गौरव केला. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय प्राचार्य मुजम्मिल सय्यद, सतिश गोटेफोडे, रोझी पठाण, हेमलता कुमार, दिपीका चव्हाण व समस्त शिक्षक वर्ग यांना दिले.
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, डॉ. लोकानंद नवखरे व्यवस्थापकीय संचालक, वैनगंगा शैक्षणिक परिसर, साकोली यांनी सुध्दा विद्यार्थ्यांचे कौतुक करुन पुढील शैक्षणिक वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन हेमलता कुमार व आभार दिपीका चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे योगदान दिले.