चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा..
लाखनी :- ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी व वनविभाग लाखनी यांचे संयुक्त विद्यमाने पर्यावरण संदेश देणारी भव्य ग्रीन सायकल रॅलीचे आयोजन वन्यजीव सप्ताह तसेच लाखनी निसर्गमहोत्सव निमित्ताने लागोपाठ सहाव्या वर्षी करण्यात आली.
लाखनी ‘नेचर पार्क’ ते सावरी ‘ग्रीन पार्क’ ते गडेगाव डेपो व परत लाखनी ‘नेचर पार्क’ अशी एकुण 14 किमी अंतराच्या ह्या भव्य ग्रीन सायकल रॅलीला लाखनी पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव,मानव सेवा मंडळाचे ऍड. शफी लद्धानी,सामाजिक कार्यकर्ते भीमराव गभने,नगरसेवक संदीप भांडारकर यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.
सर्वप्रथम ग्रीन फ्रेंड्सने लाखनी बसस्थानकावर तयार केलेल्या ‘नेचर पार्क वर वनविभाग लाखनीचे वनपाल जे. एम.बघेले व इतर सर्व वनकर्मचारी,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते,राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाचे व समर्थ विद्यालयाचे जवळपास 35 विद्यार्थी सायकलसहित जमल्यानंतर प्रत्येक सायकलला पर्यावरण संदेश ग्रीन स्टिकर,घोषवाक्ये फलक ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे पर्यावरण ब्रँड ॲम्बेसेडर प्रा.अशोक गायधने,अध्यक्ष अशोक वैद्य,पदाधिकारी अशोक नंदेश्वर,निसर्गमित्र युवराज बोबडे,रोशन बागडे,मयूर गायधने,सलाम बेग,समीर वाडेकर यांनी लावले.
सर्वच प्रमुख अतिथीचे स्वागत वृक्षरोपे देऊन केल्यानंतर आपल्या प्रास्ताविकेतून प्रा.अशोक गायधने यांनी लाखनी निसर्गमहोत्सव व वन्यजीव सप्ताह निमित्ताने भव्य 14 किमी ग्रीन सायकल रॅली आयोजन करण्याचा उद्देश समजावून दिला.
त्यात सायकल हे पर्यावरणाचे कसे प्रतीक आहे याची माहिती दिली.यानंतर सर्वच प्रमुख अतिथीनी लागोपाठ सहाव्या वर्षी ग्रीन सायकल रॅलीचे आयोजन केले त्याबद्दल ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व वनविभागाची प्रशंसा केली.
यानंतर भव्य ग्रीन सायकल रॅली घोषणा देत मुख्य महामार्गावरून सिंधी लाईनमार्गे सावरी तलावावरील ग्रीनफ्रेंड्सने तयार केलेल्या ‘ग्रीन पार्क’ येथे पोहोचली.
लाखनी पोलीस निरीक्षक ह्रदयनारायण यादव साहेब सुद्धा 3 किमी स्वतः सायकल चालवीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करीत होते.
सावरी ‘ग्रीन पार्क’ वर वृक्षारोपण कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा सायकल रॅली गडेगाव डेपो येथे पोहोचली.त्याठिकाणी वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम वनक्षेत्राधिकारी सुरज गोखले,वनपाल जे एम बघेले, मानव सेवा मंडळाचे शिवलाल निखाडे,दिलीप निर्वाण,भैय्यालाल बावनकुळे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आले.
यावेळी वन्यजीवांची आगळीवेगळी माहिती चार्टद्वारे पर्यावरण ब्रँड ॲम्बेसेडर प्रा. अशोक गायधने यांनी दिली.
सर्वच प्रमुख अतिथीनी मार्गदर्शन केल्यानंतर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे सर्व सायकलस्वार सहभागीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व वनविभागातर्फे सर्वाना अल्पोहार देण्यात आला.
कार्यक्रमानंतर सायकल रॅली लाखनी ‘नेचर पार्क’वर परत आल्यावर 14 किमी भव्य सायकल रॅलीची सांगता करण्यात आली.ह्या पर्यावरण संदेशपर सायकल रॅलीबद्दल सर्वत्र चर्चा लाखनी व परिसरात सुरु होती.
कार्यक्रमाचे व रॅलीचे बहारदार संचालन शासकीय आयटीआयचे निदेशक चक्रधर पाखमोडे ह्यांनी तर आभार प्रदर्शन वनरक्षक त्रिवेणी गायधने हिने केले.
वरील कार्यक्रमास लाखनी वनविभाग कार्यालय,लाखनी नगरपंचायत,मानव सेवा मंडळ, रा.स्व. संघ पर्यावरण विभाग भंडारा व गोंदिया जिल्हा शाखा,नेफडो जिल्हा शाखा भंडारा,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा व तालुका शाखा लाखनी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता लाखनी वनक्षेत्राचे वनरक्षक अश्विनी रंगारी,आर.व्ही.लखवाल,आकांशा चवडे,राऊत,राणे,बडोले,निश्चित जवंजार,भराडे,नितीन उशीर,सुधीर कुंभरे,बावनकुळे यांनी तसेच राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाचे विद्यार्थिनी ओझल तुमसरे,तन्नू ठवकर,यशश्री अंडेल,विजया पडोळे,वेदिका पडोळे,श्रेया देशमुख,दिक्षा चेटूले,ख़ुशी पडोळे,श्वेता नांदगावे,यशस्वी वंजारी,अपूर्वा जांभुळकर,विधी कोडापे,मयुरी निर्वाण,उन्नती देशमुख,धनश्री मेश्राम तसेच समर्थ विद्यालयाचे हरित सेना विद्यार्थी तेजस गाढवे,श्रेयस बावनकुळे,सुरज गिऱ्हेपुंजे,निहाल हटवार,यश गिऱ्हेपुंजे,यश गायधनी,प्रणव नाकाडे,इशांत भैसारे,सम्यक रामटेके,वैष्णव कुरंजेकर,जरहाण पठाण,शुभम बांते,आयुष रोकडे यांनी स्वतः सायकल चालवून कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
राणी लक्ष्मी कन्या विद्यालय मुख्याध्यापिका बारई मॅडम,हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर,समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल बडवाईक,डॉ.मनोज आगलावे,अशोका बिल्डकॉमचे नितीश नागरीकर,डॉ.छगन राखडे,डॉ.प्रमोद देशमुख,डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे,नाना वाघाये,भूपेंद्र निर्वाण,महाराष्ट्र प्लास्टिक सेंटरचे अनिल बावनकुळे,सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता रजत अतकरे व ऋतुजा वंजारी,से. नि. गोपाल बोरकर,ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,रमेश गभने,से.नि.अशोक हलमारे इत्यादीनी भव्य ग्रीन सायकल रॅली साठी अथक परिश्रम घेतले.