कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी :- नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत नगाजी व सेनानी महाराज यांच्या प्रतिमेची विधीवत पूजा अर्चना करून रामधाम तिर्थस्थळी स्थापना करण्यात आली.
आज संत नगाजी महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिर्थक्षेत्र रामधाम येथील बाबा बर्फानी गुहा परीसरात संत नगाजी व सेनानी महाराज यांच्या प्रतिमेची विधीवत पूजा अर्चना करून रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार शाम कुमार बर्वे,संस्थापक चंद्रपालजी चौकसे,नरेश बर्वे यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली.
यावेळी हजारो नाभिक समाज बांधव उपस्थित होते.यावेळी कावळे महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शरद वाटकर,नरेश लक्षणे,राहुृल गणोरकर,शेषराव येऊतकर,सुनिल लक्षणे, सुनील लाडेकर, देविदास चौधरी, संतोष गणोरकर, रविन्द्र पारधी व पारशिवनी येथील समाज बांधवांनी आपल्या आराध्य दैवता पुढे नतमस्तक होऊन अभिवादन केले.
चंद्रपालजी चौकसे यांनी नाभिक समाजाच्या आराध्य दैवत संत नगाजी व सेनानी महाराज यांच्या प्रतिमेची रामधाम तिर्थस्थळी स्थापना करून समाजाच्या दैवतांना स्थान दिले याबद्दल त्यांचा नाभिक समाजाच्या वतीने गौरविण्यात आले.
प्रत्येक पुण्यतिथीला नाभिक बांधव आपल्या आराध्य दैवता पुढे नतमस्तक होऊन अभिवादन करणार .रामधाम तिर्थस्थळी हजारो नागरिक भेट देण्यासाठी येथे येतात. नाभिक समाज बांधव यांनी सुध्दा भेट दिली पाहिजे असे चंद्रपालजी चौकसे यांनी सांगितले.
आज पर्यंत नाभिक समाज बांधवांना कोणीही न्याय व आपुलकीची वागणूक दिली नाही.
पण चंद्रपालजी चौकसे यांनी समाज बांधवांना ही अनोखी देणगी दिली असे नाभिक समाजाचे नेते गोपाल कडू यांनी म्हटले आहे.