मतदान जरूर मागा,पण दत्तात्रय मामा भरणे यांच्यावर टीका टिपणी करू नका.:- अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांचे उद्गार  — महायुतीचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ लक्ष्मी नरसिंह चरणी श्रीफळ फोडून करण्यात आला. 

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी…

      इंदापूर तालुका महा युतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचा विधानसभेच्या प्रचारार्थ लक्ष्मी नरसिंह देवस्थान येथे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

        तसेच प्रत्येक गावातील कार्यकर्ते व सरपंच यांच्या हस्ते ही श्रीफळ फोडण्यात आले. यावेळी अनेक ठिकठिकाणी गाव भेटी व घोंगडी बैठकाही घेण्यात आल्या.या कार्यक्रमासाठी बावडा लाखेवाडी गटातून सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

           ज्येष्ठ नेते दत्तामामा घोगरे,माजी सभापती प्रशांत पाटील,संचालक महादेव घाडगे,तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,जिल्हा अध्यक्ष नवनाथ रुपनवर,युवक पुणे जिल्हा ऊपअध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,बाळासाहेब करगळ धीरज पाटील,संचालक श्रीकांत बोडके,सरपंच नितीन सरवदे,सरपंच अर्चना सरवदे,सरपंच श्रीकांत दंडवते,सरपंच नरहरी काळे,माजी सरपंच विठ्ठल देशमुख,दशरथ राऊत,दत्तात्रय कोळी,सरपंच पांडुरंग डिसले,उपसरपंच दादासाहेब शिरसागर,माजी सरपंच सोमनाथ मोहिते,महावीर जगताप,विनोद मोहिते,नितीन मोहिते,कविराज मोहिते,पांडुरंग मोहिते,सचिन मोहिते,सरपंच सुदर्शन बोडके,उपसरपंच संतोष सुतार, सरपंच सुनील जगताप,माजी सरपंच उस्मान शेख,नूर मोहम्मद शेख, शनाथा रुपनवर,सुनील पालवे,शहाजीआण्णा बोडके,माजी ऊपसरपंच पांडुरंग बोडके,विलास सुळ, प्रशांत बंडगर,गोविंद सुळ,सहीत सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ आणि मतदार बंधू व भगिनी या सर्वांच्या उपस्थितीत लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीत इंदापूर तालुका विधानसभेसाठी श्रीफळ फोडून दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

         या कार्यक्रमा प्रसंगी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,आण्णासाहेब कोकाटे,प्रशांत पाटील,महादेव घाडगे,श्रीमंत ढोले,दत्तामामा घोगरे,बाळासाहेब करगळ श्रीकांत बोडके,दादासाहेब शिरसागर,नितीन सरवदे,श्रीकांत दंडवते,सोमनाथ मोहिते,सुनील पालवे,उस्मान शेख, अरुण क्षिरसागर, वर्धमान बोकडे, आदि  मान्यवर व ग्रामस्थांनी इंदापूर विधानसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भरणे मामा यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी आपले विचार व्यक्त केले. 

       या कार्यक्रमांतर्गत उपस्थित सर्वांचे आभार प्रदर्शन सरपंच नरहारी कळे यांनी मानले.