सण समारंभा प्रमाणे लोकशाहीच्या महोत्सवात मतदारांनी शामिल व्हावे :- निवडणूक निर्णय अधिकारी किशोर घाडगे… — चिमूर विधानसभा क्षेत्रात दोन लाख 79 हजार 907 मतदार मतदानाचा हक्क बजावणार..

दामोधर रामटेके/रामदास ठुसे

 कार्यकारी संपादक/विशेष विभागीय प्रतिनिधी…

      सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्साहाने सहभाग नोंदवावा तसेच लग्न समारंभ व इतर सण समारंभा प्रमाणे लोकशाहीच्या महोत्सवात सर्व मतदारांनी शामिल होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन चिमूर विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी चिमूर येथे पत्रपरिषद मध्ये केले.

            74 – चिमुर मतदार संघामध्ये विधानसभा निवडणूकी करिता चिमुर निवडणूक प्रशासन सज्ज. 

    दिनांक 20/11/2024 रोजी (बुधवार) होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता 74 – चिमुर मतदार संघामध्ये संपूर्ण निवडणूक प्रशासन सज्य झालेले आहे.

       चिमुर विधानसभा अंतर्गत 74 – चिमुर मतदार संघामध्ये एकुण मतदार :- 2 लाख 79 हजार 907 आहेत.यात पुरुष मतदार 1 लाख 40 हजार 787 आहेत तर महिला मतदार 1 लाख 39 हजार 120 आहेत.याचबरोबर नव युवक मतदार 7 हजार 047, PWD मतदार:- 1 हजार 285,85+ मतदार (जेष्ठ नागरीक)189, एकुण मतदान केंद्र :- 314 तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात येत असून त्यामध्ये 1 युवा मतदान केंद्र, 1 सर्व महिला बुथ आणि 1 दिव्यांग मतदान केंद्र यांचा अंतर्भाव असणार आहे. 

        निवडणूक निर्णय अधिकारी चिमुर विधानसभा मतदारसंघ यांचे कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. 

       सदर नियंत्रण कक्ष 24 तास असणार आहे. तसेच Cvigil App व्दारे सुध्दा नागरीकाना तक्रारी करीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

      जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदान टक्केवारी वाढविण्याचे दृष्टीकोणातुन तसेच युवा मतदार,महिला मतदार यांचे मतदान वाढावे याकरिता मतदार जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती सुध्दा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर घाडगे यांनी दिली.

         तसेच मतदार केंद्रावरती मतदारांकरिता आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक तसेच मतदार सहाय्यता कक्ष स्थापीत करण्यात येणार आहे.

       दिव्यांग व वयोवृध्द मतदारांना मतदान केंद्रात जाण्याकरिता व्हिलचेअर तसेच त्यांना मदत करण्याकरिता स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

          वयोवृध्द मतदारांना (85+) व दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणे सुलभ व्हावे याकरिता घरोघरी मतदानाची (Home Voting) ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

       यावेळी तहसीलदार श्रीधर राजमाने,नायब तहसीलदार निकुरे उपस्थित होते.

        चिमूर विधानसभातंर्गत सर्व मतदारांना आव्हान करण्यात आले की,सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता उत्स्फुपर्तपणे सहभाग नोंदवावा तसेच लग्न समारंभ व इतर सण समारंभाप्रमाणेच लोकशाहिच्या या महोत्सवात सर्व मतदारांनी सामील होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक प्रशासना मार्फत चिमूर विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी किशोर घाडगे यांनी केले आहे.