जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने मजूर महिलेचा जागिच मृत्यू.. — एक गंभीर..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

          वृत्त संपादीका

        रामदास ठुसे 

      विशेष विभागीय प्रतिनिधी..

     चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सावरगाव(महाराष्ट्र राज्य/विदर्भ) शेतशिवारत पाळीवरील कचरा कापायला मजुरीने गेलेल्या सौ.सुंदराबाई तुळशिराम चौधरी यांना जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रिमती कमलाबाई मारोती नन्नावरे या मजूर महिला जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने गंभीर झाल्या आहेत.त्यांना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे हलविण्यात आले आहे.

         ज्या शेतावर पाळीवरील कचरा कापण्यासाठी मजूर महिला गेल्या होत्या ते शेत ताराबाई घुग्गुसकर यांनी भाडेतत्त्वावर श्रिहरी आत्राम यांच्याकडून घेतले आहे.

      सकाळी ६ वाजताच्या सुमारास ग्रामीण भागातील मजूर शेतावरील कामे करायला मजूरीने जातात व दुपारनंतर घरी येतात.

         आज सकाळी ताराबाई घुग्गुसकर यांनी मृतक व गंभीर महिलेला भाडेतत्त्वावरील शेतात पाळीवर कचरा कापण्यासाठी नेले होते.

      मात्र तिथे जिवंत विद्युत तार रानटी डुक्करांना मारण्यासाठी लावून ठेवला असावा अशी शक्यता आहे.आज सकाळीच अनपेक्षित दु:खद् घटना घडल्याने मौजा सावरगाव येथील नागरिकांसह परिसरातील नागरिकात हळहळ व्यक्त केली जात आहे.सदर दुःखद् घटना स्थळाकडे परिसरातील नागरिकांनी दोन्ही महिलांना बघण्यासाठी लागलीच धाव घेतली होती.

        चिमूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आपल्या सहाकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत घटनास्थळाचा पंचनामा केलाय व पुढील तपास सुरु केलाय..