युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित, खल्लार हायस्कूल खल्लार येथील वर्ग ५ व वर्ग ८ चे विद्यार्थी अमरावती जिल्हा गणित अध्यापक मंडळा द्वारा आयोजित तालुकास्तरीय गणित संबोध परीक्षा करिता प्रविष्ट झाले होते.
यामध्ये वर्ग ५ मधून कुमारी आनंदी प्रमोद काळंके हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर कुमारी वैष्णवी बाबुराव गोरे वर्ग ८वा द्वितीय क्रमांक प्राप्त केला या त्यांच्या यशाबद्दल , संस्था अध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख, केशवराव गावंडे कार्यकारणी सदस्य, सुधाकर जुनघरे , मधुसूदन धाबे , गुणवंत गावंडे तसेच पंजाबराव टवलारे सर्व शाळा समिती सदस्य यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या त्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डी आर. नवरे व पी.डब्ल्यू.घरडे , कुमारी ऋतुजा भोंडे व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .या विद्यार्थ्यांनी विद्यालयाचा परिसरामध्ये नावलौकिक वाढविला.