कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – नदी काठावरील पवित्र महाकाली मंदीरात महाकाली सेवा समिती सत्रापुर,कन्हान व्दारे अश्विन नवरात्रीच्या निमित्ताने आज पंचमी घटस्थापना करून महाकाली नवरात्री महोत्सवाची सुरूवात करण्यात आली.
१५ ऑक्टोबंर २०२३ पासुन अश्विन नवरात्री उत्सवाची सुरूवात झाली असुन कन्हान नदी काठावरील पवित्र महाकाली मंदीर सत्रापुर,कन्हान येथे दरवर्षी प्रमाणे महाकाली सेवा समिती सत्रापुर,कन्हान व्दारे अश्विन नवरात्रीच्या पंचमी आज सकाळी १० वाजता मंदीरात सनद गुप्ता यांचे हस्ते घटस्थापन करण्यात आली व महाकाली महोत्सवाची सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी प्रकाश कडु,शरद डोणेकर,शरद नान्हे,कैलास भिवगडे,शरद शर्मा,यशवंत खंगारे,शरद वाटकर,प्रविण गोडे सह परिसरातील मान्यवर व भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
दररोज सकाळ व सायंकाळी महाआरती करून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
२७ ऑक्टोंबरला सकाळी ९ वाजता कन्हान नदीच्या पावन पात्रात घट विसर्जन करून मंदीरात प्रसाद वितरण करण्यात येणार आहे व यानंतर महोत्सवाची सांगता करण्यात येईल.
परिसरातील व दुरदुरच्या भाविक मंडळीने या अश्विन महाकाली नवरात्री महोत्सवातंर्गत महाकाली मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय माँ महाकाली सेवा समिती सत्रापुर,कन्हानचे बाबा उत्तमरावजी दुरूगकर ह्यानी केले आहे.