वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम:- कारंजा लाड तालुक्यातील लाडेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ अंतर्गत येत असलेल्या एकूण १० गावांपैकी ८ गावांमध्ये लाडेगाव,पिंपरी मोडक, कामठा,बेलखेड डोंगरगाव, पिंपळगाव,भुलोडा,कुऱ्हाड या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लांपी आजाराने जनावरांना वेठीस धरले आहे.या गावांपैकी एकूण 57 जनावरांना लांपी आजाराने त्रस्त झाले आहे.त्यापैकी ३७ जनावरे ठणठणीत झाले आहे.आणि २ जनावरे दगावले आहे.पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २ असलेले लाडेगाव येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ.एस.बी.गंदे यांच्या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणामध्ये यश दिसून येत आहे.महिला कर्मचारी असल्यामुळे १० गावांमध्ये व जनावरांना बघण्यासाठी शेतामध्ये जाणे डॉ.गंधे यांना त्रास सहन करावा लागत आहे.अशातच लाडेगाव येथील ४ वर्षापासून परिचय पद खाली असल्यामुळे महिला कर्मचारी व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे.पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २ लाडेगांव मध्ये येत असलेले गावांमध्ये लंपी आजार कहर करत आहे.पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २ लाडेगाव येथील ग्रामस्थांनी तातडीने परिचय पद भरावे यासाठी मा.गटविकास अधिकारी यांना मागणी केली आहे.
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत