चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:-
येथील कृष्णमूरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे वन्यजीवसप्ताहाच्या निमित्ताने जैवविविधता उद्यान साकोली तसेच पाटबंधारे वसाहतीत निसर्गभ्रमतीचे आयोजन करण्यात आले.यावेळी निसर्गप्रेमी ग्लोबल नेचर क्लबच्या सदस्यांना वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व व विविध दुर्मिळ होत चाललेले प्राणी पक्षी यांवर माहिती देऊन प्रत्यक्ष संवर्धनासाठी कार्य करण्याचे आवाहन नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने यांनी केले.यानंतर वनविभागाच्या जैवविविधता उद्यानात व पाटबंधारे वसाहतीत निसर्गभ्रमती करून 27 प्रकारचे अनेक पक्षी, 12 प्रकारचे फुलपाखरे,कीटक,4 प्रकारचे विविध चतुर व 6 प्रकारचे कोळी प्रजाती तसेच वनस्पतीच्या विविध प्रजातीची माहिती व ओळख प्रा अशोक गायधने यांनी कृतीपर पर्यावरण निरीक्षणातून करून दिली.
वन्यजीवसप्ताहाच्या निमित्ताने नष्ट होत चाललेल्या गिधाड पक्ष्यांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात
आली.या स्पर्धेत मिडलस्कुल गटात ऋतुजा गहाने व पूजा अग्रवाल यांना प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक वृषाली चुटे आणी गुंजन घरत यांना तर तृतीय क्रमांक ध्रुवी सपाटे व क्रिशा कशिश यांना प्राप्त झाला.हायस्कूल गटात पूर्वा बहेकार ला प्रथम तर रुणाली निंबेकरला द्वितीय तर रोहिणी भैसारे ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.कनिष्ठ महाविद्यालय गटात सौरभ मेश्राम ला प्रथम तर महेश झिंगरे ला द्वितीय क्रमांक आणी नंदिनी लांजेवार ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. चित्रांचे परीक्षण प्रा.जागेश्वर तिडके, प्रा.शीतल साहू ,पुष्पा बोरकर, प्रा के पी बिसेन ,निसर्गमित्र युवराज बोबडे यांनी केले.हरिश्चंद्र सोनवाने,प्रा शीतल साहू,युवराज बोबडे,पूर्वा बहेकार ,रुणाली निंबेकर ,रोहिणी भैसारे,पूजा अग्रवाल,ऋतुजा गहाने,अथर्व बहेकार, कविराज बडवाईक,पुष्पम चौधरी,नंदिनी लांजेवार,डालेश्वरी वाघाडे,सुनाक्षी हुकरे,रागिणी मेश्राम,सौरभ मेश्राम, महेश झिंगरे इत्यादींनी वन्यजीवसप्ताह निमित्ताने आयोजित निसर्गभ्रमतीमध्ये सहभाग नोंदवून वेगवेगळ्या पक्षी फुलपाखरे यांचे प्रत्यक्ष दर्शन व ओळख करून घेतली व आपल्या निसर्गज्ञानात भर घातली.