उमेश कांबळे ता प्र भद्रावती
मच्छी मार्केटच्या होणाऱ्या त्रासापासून कंटाळलेले शिवरकर सोसायटी येथील वार्डवासीयांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत दिनांक 18 ऑक्टोबरला मच्छी मार्केटचे स्थलांतरण करण्यात यावे करिता जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
सध्या सणासुदीचे दिवस आहे आणि तालुक्यातून व शहरातून शिवरकर सोसायटी येथील मच्छी मार्केट हा एकमेव असून गेली काही वर्षांपासून हा व्यवसाय सरकारी जागेवर चालत आहे मात्र या मच्छी मार्केटच्या मच्छीच्या सडलेल्या अवयवापासून दुर्गंधी पसरते आणि रात्रीच्या वेळी सडलेले मास खाण्यासाठी तेथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस् सुरू असतो या समस्येचा वार्डवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे बाजारपेठेच्या दिवशी तेथील खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या मुख्य रस्त्यावरील लावलेल्या दुचाकी व चारचाकी मुळे वार्ड वासीयांना येण्या जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. तत्काळ सेवेकरिता रुग्णवाहिका येण्या जाण्याकरिता अडचण निर्माण होत असते.
या होत असलेल्या त्रासा पासून शिवरकर वार्ड वासियानी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत निवेदन दिले आहे, सदर निवेदन देताना शिला आगलावे, मोनिका दोड़के, रजनी कांबळे, सोनाबाई जगजाप, प्रशांत मांडवकर, संतोष शेरकुरे, दीपक घोडमारेे,विलास तुररे, रवि झुंगरे, भारत बारापत्रे, अरुण पाठक, राजू ताजने, संजय दोड़के, आशीष गौरकार आदि उपस्थित होते