कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- पारशिवनी वनपरिक्षेत्रातंर्गत ग्राम पेठ परसोडी या जंगल व्याप्त गावातील शेतकरी चंद्रकांत ईगळे (वय ४५) यांच्यावर आज दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला चढवला.त्यात सदर शेतकरी गंभीर रित्या जखमी झाला असल्याचे वास्तव आहे.
पारशिवनी वनपरिक्षेत्रातंर्गत मौजा पेठ परसोडी येथील शेतकरी आज १९ सप्टेंबर लाभ गावाशेजारी काल भैरव पेठ जंगल व्याप्त परीसरात आपल्या म्हैस चरायला गेला असता वाघाने अचानक त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला.
त्यात शेतकरी चंद्रकांत ईगळे हा गंभीर रित्या जखमी झाला.माजी सरपंच राजेंद्र ठाकुर व माजी उपसभापती चेतन देशमुख यांनी तात्काळ वनपरिक्षेत्राधिकारी अनिल भगत यांना घटनेची माहिती दिली.
***
वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांची तत्परता…
घटनेची माहिती मिळताच पारशिवनी वनपरिक्षेत्राधिकारी अनिल भगत,वनकर्मचारी स्वप्निल डोंगरे,प्रीतम वाहने,धम्मा बेलेकर यांच्यासह घटना स्थळी पोहचून तात्काळ जखमी चंद्रकांत ईगळे यास ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे दाखल केले व प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील मॅडेटि्ना रुग्णालय रामदास पेठ येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.
जखमी युवकांला नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यासाठी स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत व वन विभागाच्या पथकाने सहकार्य केले.
जंगल व्याप्त क्षेत्रातील गावातील शेतकरी व नागरीकांनी आपले जनावरे जंगलाच्या आत नेऊन नये असे आव्हान वनपरिक्षेत्राधिकारी यांनी केले आहे.