अबोदनगो सुभाष चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती/काटकुंभ…
अमरावती :- यवतमाळ वरून परतवाडा ते चिखलदरा मार्गाने धावणाऱ्या बसला मौजा मोथा गावाजवळ अचानक आग लागली,अन् प्रवाशांमध्ये वाचण्यासाठी हलचल सुरू झाली असल्याची धक्कादायक घटना घडली.
धावणाऱ्या बसला लागलेल्या आगीला अनुसरून प्रसंगावधान राखत प्रवाशांना वाचण्यात आले.अचानक प्रसंगानुरूप धावणाऱ्या बसला आग लागली असली तरी मोठी जीवित हानी टळल्याने प्रवाशासह चालक,वाहक निःशब्द झाले.
चिखलदरा हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची व स्थानिकांची प्रवास सोय व्हावी म्हणून यवतमाळ येथून चिखलदरा करिता होल्ट गाडी पाठविण्यात येते.
परंतु सध्यास्थित मेळघाटात अतिशय निकृष्ट दर्जाच्या व भंगार बस एसटी महामंडळा तर्फे पाठवण्यात येतात,त्या केव्हाही कुठेही बंद पडतात.
यामुळे प्रवासांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.आता तर चक्क चालत्या बसला आग लागल्यामुळे थोडक्यात प्रवासी,चालक व वाहक बचावले.त्यामुळे मोठी जीवित हानी टळली.
परतवाडा वरून येताना यवतमाळ-चिखलदरा बस रात्रो नऊच्या दरम्यान परतवाडा वरुन धावत असताना मौजा मोथा गावा नजीकच्या जंगलात रोडवरच एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्यामुळे एकच तारांबळ उडाली.
या बस मध्ये वीस ते पंचवीस प्रवासी परतवाडा वरून चिखलदरा करिता प्रवास करत होते.मात्र चालकाने समय सूचकता दाखवून गाडी मार्गावर उभी करून प्रवासांचे जीव वाचवले.
बसचा समोरचा भाग पूर्ण जळाला होता.नागरिकांनी व मोथा येथील गावकऱ्यांनी चिखलदरा येथील नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला बोलावल्याने आग विझविण्यात आली व प्रवासांना सुखरूप गाडीच्या बाहेर काढण्यात आले.
सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती आहे.