दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
चिमूर तालुक्यातंर्गत मौजा नेरी येथील प्रशिध्द समाजसेवक प्रल्हाद लाडे यांच्या पत्नी जिजाबाई प्रल्हाद लाडे यांनी आज सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्ष होते.
मागील २० दिवसांपासून मृतक जिजाबाई प्रल्हाद लाडे व प्रल्हाद लाडे हे शिक्षिका असलेल्या कन्या वर्षा लाडे (बन्सोड) व जावई श्री.माधव बन्सोड (शिक्षक) यांच्या कडे उपचारार्थ चिमूर येथे मुक्कामी होते.
आज अचानक साडे आठ वाजताच्या दरम्यान जिजाबाई यांची प्राणज्योत मालवली यामुळे लाडे,कऱ्हाडे,बन्सोड व इतर परिवारात शोककळा पसरली.
चिमूर नगर परिषदे अंतर्गत येत असलेल्या मौजा वडाळा (पैकू) येथील स्मशानभूमीत त्यांना चिताग्नी देण्यात देण्यात आले.
जिजाबाई प्रल्हाद लाडे यांच्या चिताग्नी विधीला प्रारंभ होणार तेवढ्यात जगप्रसिद्ध महास्थविर भदंत ज्ञानज्योती, थेरो धम्मचेत्ती यांच्यासह संघारामगिरीचा भिख्खू संघ चिताग्नी स्थळी दाखल झालाय.यामुळे स्मशानभूमीत सर्व उपस्थित आप्तपरिवारातील मंडळींना काही काळ सुखद् क्षण अनुभवायला आलेत.
मृतक जिजाबाई प्रल्हाद लाडे या शांत व स्वयंमी स्वभावाच्या होत्या व समजदार गुणधर्मी होत्या.त्यांच्या पश्चात पती प्रल्हाद लाडे,मुली,मुलगा,सुन,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.