प्रधानमंत्री मोदींनी,CJI चंद्रचूड साहेबांच्या घरी गणपतीच्या आरतीला जाणे..
प्रोटोकॉलच्या विरुद्ध..
केवळ कुटनीतीचा विजय…
म्हणून निषेध…..
” संसदीय लोकशाही आणि संविधान यातील घटनात्मक आणि नैतिक नियमानुसार कार्यकारी मंडळापासून न्याययंत्रणा स्वतंत्र आहे.
त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी कॅमेरे ( मीडिया ) घेऊन CJI च्या निवासस्थानी जाणे आणि ते व्हिडीओ व्हायरल करणे किंवा करण्याची परवानगी देणे.हा त्यांच्या वयक्तिक राजकीय कुटनीतीचा एक भाग दिसतो आहे…
कारण जेंव्हा एक व्यक्ती म्हणून व्यक्तीस्वातंत्र्याच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार ते जर CJI च्या घरी गणपतीच्या आरतीला गेले असं जर देशाला दाखवू इच्छित असतील तर ते एकतर जनतेला किंवा देशाला प्रोटोकॉल माहित नाही असा गैरसमज करत आहेत.कारण एवढ्या मोठ्या संविधानिक जबाबदार पदावर बसल्यानंतर त्यांचे 24 तास सुद्धा त्या प्रोटोकॉलनुसारच प्रवाहीत असतात..
असे जर नसते…..
तर मग प्रधानमंत्री जर त्यांच्या पक्षाच्या प्रचारसभा,रॅली यात सहभागी होऊन पक्षाचा निवडणुकीत प्रचार करू शकत नाहीत.कारण राजकीय पक्ष वेगळी बाब आहे आणि देशाचे प्रधानमंत्रीपद ही वेगळी बाब आहे.
एकदा डॉ.राजेंद्र प्रसाद देशाचे प्रथम राष्ट्रपती जेंव्हा एका दौऱ्यात बिहारमध्ये आले असता, त्याचे जूने मित्र छगलानी यांनी त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले.तेंव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की,मी एका जबाबदार संविधानिक पदावर असतांना मी तुमच्याकडे भोजनास येऊ शकत नाही.
ही प्रोटोकॉल पाळण्याची नैतिकता आणि कर्तव्य आहे..
म्हणून प्रधानमंत्री यांनी CJI च्या घरी आरतीला जाणे हे नैतिक आणि घटनात्मकदृष्ट्या निषीद्धच आहे.!
मोदी हे राजकारणातील कुटनीतीचा वापर करून न्याययंत्रणेला आपल्या ताब्यात घेऊ पाहत असतील तर,किंवा असा संदेश अप्रत्यक्षरित्या देशाला व जनतेला देवू इच्छित असतील…
तर असा नालायक,अज्ञानी आणि मूर्ख प्रधानमंत्री देशाने कधी अनुभवला नाही हेच सिद्ध होते!
अरे देशाची जनता 140 कोटी आहे..
संयमही तेवढ्याच ताकदीचा आहे……
याचा अर्थ असा नाही की,तू म्हणशील तीच पूर्व दिशा…
शेवटी CJI यांचे उर्वरित दोन महिनेच ते कुटनीतीचे आहेत की संविधानिक आहेत ते ठरणार आहेत.ते जर तुमच्याच कुटनीतीच्या वाटेने गेले…
तर सर्व अधिकार रांगत्या बाळाला ( सर्वसामान्य जनतेला ) दोन पायावर ताबडतोब उभे राहून,लोकशाही आणि संविधानातील सर्वच घटकांना वठणीवर आणण्यासाठी जाती – धर्माच्या व राजकारणाच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येऊन लढा देण्यासाठी सज्ज होऊ..
म्हणून लोकशाही व संविधानावरील वयक्तिक आणि सामुदायिक हल्ला परतवणे, हे प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689..