नीरा नरसिंहपुर दिनांक :19
प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार,
मंगलमय वातावरणातआज मंगळवार दि.19 रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी गणरायाचे आगमन होऊन गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गणरायाचे पूजन करीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रार्थना केली की या दहा दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून महाराष्ट्रावरचे दुष्काळाचे सावट, संकट दूर व्हावे.
माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या निवासस्थानी कुटुंबासमवेत गणरायाचे उत्स्फूर्त स्वागत केले यावेळी त्यांच्या पत्नी जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते राजवर्धन पाटील , जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सध्या महाराष्ट्रावर पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे दोन तृतीयांश पेक्षा जास्त भाग महाराष्ट्राचा आज दुष्काळाच्या छायेत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचा , जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच छोट्या-मोठ्या उद्योगापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.सर्व कुटुंबामध्ये गणरायांचे उस्फूर्त स्वागत केले जाते तसेच हा उत्सव देशभर आनंदाने साजरा केला जातो. गणरायाचे एकरूप म्हणजे विघ्नहर्ता असून महाराष्ट्रावर जे दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे ते दूर करण्यासाठी एवढ्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून हे संकट टळू दे अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली.