दिं.१९ सप्टेंबर २०२२

 

सावली (सुधाकर दुधे)

 

 गडचिरोली-चिमूर लोकसभे चे खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते हा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना देशाचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर हा पंधरवडा कार्यक्रम सेवा सप्ताह म्हणून आयोजित करावा.

 

 तसेच देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध असून देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे व्रत हाती घेतले आहे. असे प्रतिपादन या प्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले.

 

वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने  सुधीरभाऊ मुनगंटीवार वनेमंत्री होते.त्यावेळी 33 कोटी वृक्ष लागवड करून महाराष्ट्र राज्याचा गौरव म्हणून कार्य केले.वृक्ष लागवड करने ही एक काळाची गरज आहे.प्रत्येक व्यक्तीने एक तरी वृक्ष लावला पाहिजे.असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते या प्रसंगी सुद्धा केले.

 

भारतीय जनता पार्टी तालुका सावली शाखा-पाथरी च्या वतीने वृक्षारोपण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 

यावेळी खा.अशोकजी नेते यांनी

 ग्रामपंचायत कार्यालय पाथरी येथे आढावा घेऊन जनतेच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या या आढावा कार्यक्रमाचे संचालन व प्रस्ताविक तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी केले.याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

 

या कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल,महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोमावार,महामंत्री दिलीप ठिकरे,कोषाध्यक्ष अर्जुनजी भोयर,ज्येष्ठ नेते प्रकाश पा.गडमवार, ठाणेदार मोहोर साहेब, सरपंच्या सौ.अनिता ठिकरे, उपसरपंच प्रफुलजी तुम्हे,प्रविण वाघमारे ग्रा.पं सदस्य,सरपंच गुरु मिसार, सौ.अल्काताई वाघमारे ग्रा.पं.सदस्या, सौ.प्रीतीताई लाडे ग्रा.पं.सदस्या, दिलिप करकाडे,शरद सोनवाणे, निखिल सुरमवार,लोकनाथ रायपुरे, नितिनजी अढिया,दिपक रामटेके, विश्वनाथजी येरणे,तसेच भाजपाचे पदाधिकारी व अनेक महिलावर्ग व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com