चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

साकोली:- भारतातून नामशेष झालेल्या चिता या प्राण्याचे दिनांक 17 सप्टेंबर 22 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात आठ चित्ते आणले असून चिता बद्दल जन जागृती मोहीम स्थानिक वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील शाळेत चित्ता जनजागरण मोहीम सुरू करण्यात आले आहे .

 

शेंदूरवाफा व खांबा येथील प्राथमिक शाळेत चिता बद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले यावेळेस वनपरिक्षेत्र अधिकारी एस.टी. मेंढे ,क्षेत्र सहाय्यक एस .के. खांडेकर ,वनरक्षक एस. जी .जाधव, एस. आर. आंबुले ,एस.टी. भुसारी , ए .एम .उपाध्ये, ऊपस्थित होते. चिता हा शब्द संस्कृत मधून आला आहे . चित्याचे वजन 50 ते 64 किलो असून चित्याचे आयुष्यमान सरासरी 12 ते 13 वर्षाचे असते चिता हा सकाळी उशिरा व सायंकाळी शिकार करतो मात्र चिता सिंहाप्रमाणे गर्जना करू शकत नाही त्याऐवजी तो फक्त गुर गुरतो चित्याबाबत चिता शिकार केल्यानंतर त्याला फक्त शिकारीतला काही भाग खायला मिळतो कारण त्याचे प्रतिस्पर्धी असलेले जंगली प्राणी त्याच्या शिकार हिसकावून घेतात . एकेकाळी भारतात 1800 च्या वर चिते होते परंतु अवैध शिकारीमुळे भारतातून 1952 पर्यंत सर्व चिते नामसेष झाले अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.टी. मेंढे यांनी विद्यार्थ्यांना दिली . भारतात येत आलेले एकूण आठ चित्ते हे मध्य प्रदेशातील कुनो, राष्ट्रीय उद्यानात ठेवले जातील.

 

भारतात चित्ते आणावे याकरिता मागील बऱ्याच वर्षापासून प्रयत्न सुरू होते शेवटी सर्वोच्च न्यायालयाने भारतात चित्ते आणण्याचा मार्ग मोकळा केला ,परंतु जगभर कोरोना महामारीमुळे चिता भारतात आणण्याच्या योजनेला उशीर झाला शेवटी स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर भारतात चित्यांचे आगमन होत आहे . त्यामुळे वन्यजीव प्रेमी मध्ये आनंदाची वातावरण असून वन्यजीव प्रेमींना आता भारतातच चित्याचे दर्शन होणार असल्यामुळे आपल्याला चित्ते कधी पहायला मिळतील अशी इच्छा प्रत्येक वन्यजीव प्रेमींच्या मनात आहे. 

साकोली वन विभागातर्फे आयोजित कार्यक्रम.

 शेंदुर्वाफा येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश ठाकरे, चेतन बोरकर, हेमलता फुल बांदे, उषा खेडीकर ,मुन्नीबाई कटरे, दीपक वैरागडे, आय .एम .कसारे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबा येथील मुख्याध्यापक डी .ए. थोटे ,बि.के. मूंगमोडे, एल. एम. दुर्वे ,आर. बी. चिचामे ,डी.पी. परशुरामकर, सौ पुष्पकला परसरामकर व शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

     “भारतातून चिता 1952 मध्ये राजस्थान व मध्य प्रदेशातून नामशेष झाला असून चिता भारतात यावा याकरिता खूप शर्तीचे प्रयत्न करण्यात आले असून स्थानिक स्तरावर चित्त्यांचे पुनर्वसन व संरक्षण करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणे सोबतच स्थानिक नागरिकांची सुद्धा आहे.” 

 

रोशन राठोड ,

सहायक वन संरक्षक ,

वन विभाग ,साकोली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News