चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:- राष्ट्रिय OBCमहासंघ तालुका साकोलीच्या वतिने मा.अरुण पारधी सर जि.प.हाय.लाखांदूर, मा.हेमराज हेमणे जि.प.प्राथ.शाळा बोंडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी डा.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतिराव फूले,सावित्रीबाई फुले,राजश्री शाहु महाराज,छत्रपती शिवराय,या थोर महापुरुषांची आदर्श विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे असे सत्कार प्रसंगी अपेक्षा उपस्थित सर्वश्री उमेश कठाणे,प्रभाकर सपाटे,अश्विन नशिने,डा.अनिल शेंडे,राधेश्याम खोब्रागडे, सूरेश बोरकर,सोनु थानथराटे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सौ.पडोळेताई शिक्षिका,सौ.हेमणे तसेच राष्ट्रिय OBCमहासंघ,कांग्रेस,राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.