पारशिवनी :- तालुक्यातील काद्री कन्हान कोयला श्रमिक सभा एच. एम.एस.व्दारे काद्री येथिल मातोश्री सभागृह येथे इयत्ता १० व १२ वीच्या गुणवत्ता प्राप्त शेकडो विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय अध्यक्ष शिवकुमार यादव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोळसा श्रमिक सभा एचएमएसचे केंद्रीय अध्यक्ष शिवकुमार यादव व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव करण्यात आला.
विद्यार्थी त्यांच्या पालकांसह या कार्यक्रमात सामील झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थियाना प्रमाणपत्र,मेडल, स्मृतीचिन्ह व पुष्प गुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला,यावेळी कोयला श्रमिक सभा एच एम एच चे केन्दिय अध्यक्ष शिवकुमार यादव यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
या प्रसंगी कार्यक्रमाला विशेष उपस्थित म्हणून शिशुपाल यादव, झिबल सरोदे, पलीये बाबू, नगर सेविका मोनिका पौनीकर, प्रहार जनशक्ती संगठनचे जिल्हा अध्यक्ष रमेश कारामोरे, डॉ. गजराज देविया, साबीर सिद्दीकी, जावेद खान, राकेश यादव आदी उपस्थित होते.
गुणवत छात्र सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजक तथा संगठनचे पदाधिकारी विद्यार्थी सत्कार समारोह कार्यक्रमाचे प्रसताविक केले तर संचालन वीर सिंग यानी केले.तसेच आभार लोकेश बावनकर यांनी मानले.