नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली: साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे सर्वांगीण शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अनेक उपक्रम राबविले जात आहेत त्यानुसार 17 सप्टेंबर 2022 रोजी पोषण आहाराचे महत्त्व याविषयी जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांची गावात सायकल रॅली काढण्यात आली .तसेच विद्यालयात पाककृतीवर आधारित कडधान्य व डाळीची सुंदर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.

शासनाच्या परिपत्रकानुसार देशभर सुरू असलेल्या शालेय पोषण माह अंतर्गत पोषण आहाराचे महत्त्व स्थानिक स्तरावर पिकविण्यात येणारे धान्य, पोषण तत्व ,पाककृती यावर भर देण्यात आला. पोषण माहचे महत्व शालेय जीवनापासून रुजविण्यासाठी जास्तीत जास्त शाळांमध्ये पळसबाग विकसित करणे, व याच पळस बागेतील साहित्य वापरून पोषण आहार शिजविण्यावर भर देणे ,पारंपारिक पाककृतींचा वापर करण्याकडे लक्ष वेधणे, यासाठी पाककृती ,स्पर्धा रांगोळी स्पर्धा रॅलीद्वारे जनजागृती करणे या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांना सहभाग नोंदवीणे अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या. 

विद्यालयाचे प्राचार्य अमोल हलमारे यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले यात उपसरपंच पतीराम निंबेकर, पालक मोहन बोरकर ,अंगणवाडी शिक्षिका तारा ,समरीत ज्येष्ठ शिक्षक बाळकृष्ण दोनोडे तसेच पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी विद्यालयात आयोजित रांगोळी स्पर्धेत विद्यार्थिनींनी पाककलेच्या विविध नमुण्यांचे सुंदर पद्धतीने सादरीकरण केले यासाठी परिसरात पिकणाऱ्या डाळी व कडधान्यांचा वापर करण्यात आला. प्राचार्य अमोल हलमारे , संस्थेच्या सदस्या सुजाता गोमासे ,पर्यवेक्षक विनायक मारवाडे, ज्येष्ठ शिक्षक बाळकृष्ण दोनोडे, शिक्षिका सविता मारवाडे आदींनी या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण करून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com