ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली तालुक्यातील चांदोरी /उसगाव येथील हिमांशू वंजय खोब्रागडे याने नीट परीक्षेत ७२०पैकी ६५० गुण प्राप्त केले व वैद्यकीय क्षेत्रात त्याची निवड झाली. घरची परिस्थिती बेताची घरी एक एकर शेती , वडिलांचा व आईचा जोड धंदा बायलर चिकन विक्री व बांगड्या विकण्याचा या कठीन परिस्थित उल्लेखनीय म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचे शिकवणी वर्ग न लावता घरी राहून हे यश प्राप्त केले आहे.
जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे यांनी भेट देऊन हिमांशूचा सत्कार करन्यात आला. याप्रसंगी हिमांशूचे कुटुंबीय तसेच ग्रामपंचायत सदस्य देवाजी हातझाडे, पोलीस पाटील सेवकरामजी काळसर्पे, टोलीरामजी हातझाडे, रमेशजी शेंदरे, मनीषाताई हातझाडे आदी मान्यवर उपस्थित होते.