ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली: साकोली पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवनीबांध जलाशयाचे ओवरफ्लो झाल्याने आनंद घेण्यासाठी तलावावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासणाने बंदोबस्त ठेवला नसल्याने पाण्यात उतरण्याचा आनंद नागरिक घेत आहेत. सोमवारपासून येणाऱ्या संततधार पावसाने नदी नाल्यांना पूर आलेला आहे त्यातच तालुक्यात असलेले निसर्गरम्य ठिकाण शिवनीबांध जलाशय ओवरफ्लो झाल्याने या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक पर्यटक जलाशयातील पाण्यात होण्याची मजा घेत आहेत नदी नाल्याची पाण्याची पातळी अतिवृष्टीने वाढलेली आहे त्यामुळे नागरिकांनी खोल पाण्यात उतरू नये असा इशारा साकोलीचे तहसीलदार रमेश कुंभरे व साकोलीचे पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी दिला आहे.
तालुक्यात यापूर्वीही अनेक ठिकाणी नदी नाल्यांमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी खोल पाण्यात उतरू नये असा सतर्कतेच्या इशारा तहसीलदारांनी व पोलीस निरीक्षक यांनी दिलेला आहे.तसेच शिवनीबांध जलाशय ओवरफ्लो झाल्याने धान पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हे नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे.