अधिकारी आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत पीएसआय डिसेंबर दिवटे यांचे मार्गदर्शन..

प्रितम जनबंधु

    संपादक  

         स्थानिक नेवजबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे नुकतेच पीएसआय पदाला गवसनी घालणारे डिसेंबर दिवटे यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. सदर उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले पीएसआय डिसेंबर दिवटे सर यांचा शाल व श्रीफळ देऊन ने.ही. महाविद्यालयाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. एम. नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री ए. डब्लु. नाकाडे हे व्यासपीठावर उपस्थित होते..

      “अधिकारी आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत मार्गदर्शक म्हणून लाभलेले पीएसआय डिसेंबर दिवटे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन स्वतःचा जीवन प्रवास उलगडून सांगितला. प्रयत्नांची पराकाष्टा करून अपयशाची कुठली भीती न बाळगता कशाप्रकारे पीएसआय पदाला गवसणी घातली याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितले.

              डिसेंबर दिवटे हे सावली तालुक्यातील बल्लारपूर (माल) या छोट्याशा गावातून शिक्षण घेऊन आणि मनात अधिकाऱ्याचे स्वप्न बाळगून अभ्यासाला सुरुवात केली. या प्रवासा दरम्यान त्यांचा खूप मोठा अपघात झाल्याने पीएसआय पदाचे स्वप्न अधुरे राहते काय असं त्यांना वाटत होतं परंतु मनातील जिद्द आणि पीएसआय होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते आणि याच जिद्दीने आलेल्या अपयशावर मात करत एमपीएससी मार्फत पीएसआय पदाला गवसणी घातली. 

              पुढे बोलतांना विद्यार्थ्यांना सांगितले की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वेळेचे भान असणे गरजेचे आहे. वेळेचे महत्त्व जो विद्यार्थी जाणतो तोच विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतो म्हणून विद्यार्थ्यांनी वेळेचा अगदी काटेकोरपणे पालन करून अभ्यासाचे नियोजन करावे कुठल्याही परिस्थितीचा बाऊ न करता आणि पराभवाने खचून न जाता अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळतो. असा आशावादी विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवला….

           सोबतच एमपीएससी च्या अभ्यासक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगून भविष्यात विद्यार्थ्यांनी सुद्धा अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने मार्गक्रमण करावे असेही ते म्हणाले.

             नाकाडे सर यांनी प्रास्ताविक मार्गदर्शनातुन “अधिकारी आपल्या दारी” या अभिनव उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन, उराशी मोठे स्वप्न बाळगून आपणही स्वप्नांचा पाठलाग करावा आणि जीवनात यशस्वी व्हावे असा मूलमंत्र दिला. तद्वतच पीएसआय डिसेंबर दिवटे यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन हे यश मिळवलेले आहे. हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल आणि भविष्यात ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी अधिकारी होतील. डिसेंबर दिवटे यांच्या बद्दल सांगताना ते म्हणाले की डिसेंबर दिवटे अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून सावरून अविरत अभ्यास करून त्यांनी हे यश मिळवले असल्याचे सुचक विधानही त्यांनी केले. 

        कार्यक्रमाचे अध्यक्ष केएम नाईक अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना म्हणतात विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वप्नांचा पाठलाग करणे अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी मोठे स्वप्न बघावे आणि त्या दिशेने मार्गक्रमण करावे असा प्रेरणादायी विचार प्रकट केला. आणी अधिकारी आपल्या दारी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निश्चितच फायदा होईल त्या दिशेने आपले विद्यालय आणि विद्यालयातील शिक्षक नेहमीच तत्पर असून नवनवीन अधिकाऱ्यांना विद्यालयात बोलावून त्यांचे मार्गदर्शन आयोजित केले जातील असेही ते म्हणाले..

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नाकाडे सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी जी बेंदेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री लक्ष्मण मेश्राम यांनी मानले.

            कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा लाभ घेतला.