पोलिसांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी,एनएसएस स्वयंसेवकांचा उपक्रम… 

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी कात्रज पोलिस ठाण्यात रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.

          या उपक्रमात अंतर्गत 20 स्वयंसेवकांनी 50 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या अविरत सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

              या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल कदम, प्रा.प्रशांत यादव, प्रा.तुलसीहार पाटील आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विदुला सोहोनी, उपप्राचार्य डॉ.सचिन चव्हाण आणि डॉ.सुनीता जाधव यांनी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले.

            कात्रज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी दशरथ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या समाजसेवेच्या कार्याची प्रशंसा केली. स्वयंसेवकांनी या सणाच्या माध्यमातून पोलिसांचे समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे, याची जाणीव व्यक्त केली. तर पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या या स्नेहभावनेचे कौतुक केले. या उपक्रमामुळे पोलिस आणि विद्यार्थी यांच्यातील आपुलकीची भावना अधिक दृढ झाली.