सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधातील भारत बंदला पीरिपाचे समर्थन :- चरणदास इंगोले…

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

             भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रीमिलेयरच्या च्या संदर्भात दिलेल्या निर्णयाचा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नांदेड येथे 16 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

            पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या निर्देशावरून, दिनांक 21 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष व संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने समर्थन जाहीर करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी दिली आहे.

          पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यातील सर्व जिल्हा व तालुका शाखांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा. याबाबतचे निवेदन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी व तहसीलदारा मार्फत सादर केले जाणार असल्याचेही चरणदास इंगोले यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.