शिक्षक बँकेच्या आमसभेमध्ये पाच संचालकांवरील अविश्वास ठराव रद्द..

  युवराज डोंगरे

उपसंपादक/खल्लार 

       जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा 18 ऑगस्टला अमरावती येथील पार पडली. ही आम सभा नेहमी पेक्षा वेगळी होती.त्यामध्ये पाच संचालकाला अविश्वास टाकून काढले होते.संचालकांना काढणे ही बाब अतिशय गंभीर होती. 

        जर ते एखाद्या अध्यक्षपदावर असतील उपाध्यक्ष पदावर असतील किंवा कोणत्या महत्त्वाच्या पदावर असतील आणि त्यांनी जर भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना काढणे योग्य बाब होती. 

        पण विरोधकांनी काहीच बोलू नये या करिता सत्ताधारी संचालक मंडळाने 5 संचालकावर अविश्वास ठराव आणला होता,हा चुकीचा पायंडा पाडला होता. 

      आज तुमची सत्ता आहे उद्या दुसऱ्याची येईल.मग काय सत्ताधाऱ्यांनी विरोधकाला काढुन टाकणे ही बाब योग्य नाही.सत्ताधारी संचालक मंडळाचे काही सभासदांनी सुद्धा आमच्याकडे बोलून दाखवले की ही बाब योग्य नाही.

         कारण ते जनतेने निवडून दिलेले आहे.तुम्ही नाही? तुम्हाला त्यांना काढण्याचा अधिकार मुळीच नाही.

         या करिता शिक्षक बँकेच्या वार्षिक आम-सभेमध्ये किरण पाटील राज्य उपाध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांनी शिक्षक बँकेचे आमसभेमध्ये 5 संचालकावर अविश्वास ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. 

         त्याला अनुमोदन डी.आर. जामनिक सरसिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ दर्यापूर यांनी दिले.तर याला आमसभेतील अमरावती जिल्हातील अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ,व मित्र पक्षांनी आणि बाहेरील आलेल्या सर्वं सभासदांनी पाच संचालकांवरील अविश्वास ठराव मोठ्या आवाजाने रद्द करण्यासाठी हात वर करून मान्यता दिली.

           या करिता अमरावती जिल्ह्यातून आलेल्या तमाम शिक्षक मंडळींचे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावतीच्या वतीने आभार मानले.