रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर :- भारतीय संविधानातील तरतुदी नुसार अनुसूचित जाति,जमाती साठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली त्यानुसार अणु जाती,जमातीला राजकीय,सामाजिक आरक्षण मिळत आहे.
मात्र नुकताच 1ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाति,जमाती यांच्या आरक्षणात वर्गिकरण करून क्रिमीलेयरची कारवाई करण्याची जवाबदारी राज्य सरकार यांच्याकडे दिली.
हा निरवाडा अनुसूचित जाति,जमाती यांच्या आरक्षणावर घाला घालणारा असल्याने हा निरवाडा मागे घ्यावा,अश्या आशयाचे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले.
अनुसूचित जाति,जमाती आरक्षण बचाव समिती भदन्त ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वात चिमूर येथील संविधान चौक येथून शेकडो आंबेडकरी जनतेच्या उपस्थितीत मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
“आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,तसेच केंद्र व राज्यसरकार यांच्या विरोधात घोषणा देत मोर्चा पोलीस स्टेशन,हजारे पेट्रोलपंप,मार्गे आंबेडकर स्मारक येथे जात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा तहसील कार्यालयाकड वळला व तहसिल कार्यालयापुढे मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले.
मोर्चाला भदन्त ज्ञानज्योती, डॉ.रमेशकुमार गजभे,वर्षा शामकुळे वर्धा,डॉ.अनमोल शेंडे,भगवान बोढे,अरविंद सांदेकर,आदींनी मार्गदर्शन केले. मोर्चाचे व सभेचे संचालन भन्ते चेती यांनी केले.
*****
वर्गीकरणाचा विषय संसदे मध्ये उचलून धरणार!
मोर्चा दरम्यान खासदार डॉ. नामदेव किरसाण यांनी भेट दिली असता त्यांनीही मोर्चाला संबोधित केले.अनुसूचित जाति,जमाती यांच्या आरक्षणाचे वर्गीकरण व क्रिमीलेयर हे अन्याय करणारे आहे.त्यामुळे या निर्णयावर संसदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासन उपस्थित आंबेडकरी अनुयायांना दिले.
*****
भन्ते जरी असलो तरी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाति,जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण व क्रिमीलेयर लागू करण्यासाठी दिलेला निर्णय हा अन्याय करणारा आहे.त्यामुळे सामाजिक सामानते साठी व सामाजिक जागृती करण्यासाठी हा मोर्चाचं आयोजन करण्यात आला.
भदन्त ज्ञानज्योती महाथेरो..
संघारामगिरी
ताडोबा अभयारण्य..तथा विपश्यना सेंटर गुजगव्हान