प्रा.मुक्ता गरसोळे – कुलकर्णी संपादित “रंजक संस्कृत” या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : संस्कृत विद्वानापेक्षांही संस्कृतची आवड असणाऱ्या संस्कृत रंजकता जाणून घ्यायची इच्छा असणाऱ्यांनी वाचकांसाठी रंजक संस्कृत हे संस्कृत बद्दल ची गोडी वाढवणारे, उपयुक्त ठरेल अशी आशा आहे असे प्रतिपादन आळंदी देवस्थानचे मा.प्रमुख विश्वस्त डॉ.सुरेश गरसोळे यांनी व्यक्त केल.

        हभप प्राचार्य वै.सोनोपंत दांडेकर संत वाङ्‌मय प्रसारक मंडळातर्फे संस्कृत दिनानिमित्त मुक्ताताई गरसोळे – कुलकर्णी संपादित “रंजक संस्कृत” या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोहळा डॉ.सुरेश गरसोळे, गोविंदराव बेडेकर यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी डॉ.प्रकाश सोमन, सीना गरसोळे, मुक्ताताई गरसोळे – कुलकर्णी, रोहित कुलकर्णी उपस्थित होते.

          संस्कृत आणि संस्कार यांचे अतूट नाते भारतीय संस्कृतीतून प्रतीत होते, त्यांची जाण युवा पुढीला अभ्यासकांना माध्यमांना प्रबोधन करणाऱ्यांना करुन देण्यासाठी प्रयत्न म्हणजे प्रा.मुक्ताताई गरसोळे – कुलकर्णी संपादित रंजक संस्कृत हे पुस्तक आहे असे डॉ.सुरेश गरसोळे यांनी सांगितले आहे.