
निरा नरशिंहपुर :दिनांक ,19
प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार,
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष, युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि.19) करण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत 161 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
अलीकडच्या काळात राज्यामध्ये अनेकदा रक्तदानाचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे रक्तदान शिबिरांची गरज आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याने समाजामध्ये रक्तदानाची चळवळ मोठ्या प्रमाणावरती वाढीस लागण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले.
यावेळी कारखान्याचे संचालक वसंतराव मोहोळकर, पराग जाधव, राहुल जाधव, आबासाहेब शिंगाडे, प्रवीण देवकर, छगनराव भोंगळे, भूषण काळे, कुबेर पवार आदींसह संचालक कार्यकारी संचालक देवराव लोकरे, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांचे सहकार्य लाभले.