युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर ते आसेगाव रोडच्या कडेला मोठ्या व्यासाची शहानुर योजनेची जलवाहिनी टाकलेली असून ती चुकिच्या पध्दतीने विश्वराज कंपनीने टाकलेली आहे.
सदर जलवाहीनीची पाईप लाईन जमीनीत टाकतांना तिची खोली 4 फुट पेक्षा जास्त असायला हवी होती परंतु सदर कंपनीने निकृष्ठ दर्जाचे काम करुन जलवाहिनीचे पाईप 1 ते 2 फुटावर टाकण्यात आले आहेत. सदर जलवाहिनी शेतातून गेल्यामुळे आणि कमी खोलीवर असल्याने पावसाच्या पाण्याने वाहून जाण्याची दाट शक्यता आहे.
सदर बाब नियमाचे उल्लंघन करणारी आहे. जलवाहिनी 1 ते 2 फुटावर टाकल्यामुळे पाणी पोहोचण्यास दिरंगाई होईल अशी तक्रार युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूर यांच्याकडे केली असता त्या तक्रारीवर दुर्लक्ष होत असल्याने अंकुश पाटील कावडकर यांनी तत्काळ कार्यकारी अभियंता जलजीवन मिशन अमरावती यांना भेटून तक्रार दिली.
त्यावर कार्यकारी अभियंता उपरेलू यांनी सांगितले की लवकरात लवकर आम्ही याची पाहणी करू त्यावेळी आपल्याला सुद्धा बोलावू आणि जे कोणी दोषी आढळणार त्यांच्यावर कारवाई करू.
पाईपलाईन जर नियमानुसार तेवढ्या खोलीवर नसेल तर ती पूर्ण पाईपलाईन कंत्राटदाराला काढायला लावू आणि पुन्हा काम करायला लावु असे सांगितले.
एवढ्यावर युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर न थांबता त्यांनी पाईपलाईन कमी फुटावर खोल असल्याने पाईपलाईन जर वाहून गेली तर याला दोषी आपले अधिकारी असतील.
योग्य कार्यवाही झाली नाही तर युवासेना मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.