हिवरा-साठगांव रस्त्यावरील नदीतील पुल तात्काळ करा :-शुभम मंडपे यांची मागणी…

      रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

       मौजा हिवरा-साठगांव रस्त्यावरील नदीतील पुल पूर्ण वाहून गेला त्यामुळे हिवरा वासियांचे येणे जाणे बंद झाले. त्या मार्गांवर जवराबोडी, साठगांव, हिवरा, वाकर्ला, बोरगाव, मेळा, येथील शेतजमिनी असल्यामुळे शेतकऱ्याचे, शेतमजूरांचे, विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहेत मौजा हिवरा येथील विद्यार्थ्यांची शाळा आठ दिवसापासून बंद आहे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे, गावकरी किराणा,राशन घेण्यासाठी साठगांव येथे नदीच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करीत आहेत. 

 

          प्रशासनाला दीड महिन्याची अवधी मिळून सुद्धा कंत्राटदाराच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. साठगावाच्या उपसरपंच प्रीतीताई दीडमुटे यांनी प्रसनाला कडवले असता कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

         ही घटना आंबोली ग्रा.प. सदस्य व वंचित बहुजन युवाआघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांच्या लक्षात येताच घटनास्थळी जाऊन गावाकऱ्यांसोबत पुलाची पाहणी केली व SDM साहेब चिमुर व तहसीलदार साहेब चिमुर यांच्याशि फोनद्वारे बोलणे करून तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितले तसेच PWD कार्यालय चिमुर येथील उपगंडतवार सरांनी 3 दिवसात काम करू अशे आश्वासन दिले.