महाराष्ट्र प्रदेश,”आदिवासी काँग्रेस कमिटी,यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न….

अबोदनगो सुभाष चव्हाण

  अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

          दखल न्युज भारत

          18 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करण्यात आले.

       18 जुलै 2024 रोजी दोन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले.यात प्रथमतः तालुका अचलपूर शाखाचे उद्घाटन झाले तर दुसऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तालुक्याचे स्थळ असलेल्या चिखलदरा येथे झाले. 

         या कार्यालय मध्ये आदिवासी व बहुजन बांधव यांच्या सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,शैक्षणिक समस्या सोडवण्यात येतील असे उद्घाटन प्रसंगी सांगण्यात आले.

        या कार्यक्रमात,खासदार बळवंतराव वानखडे तसेच अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री.बबलू भाऊ देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते.

         तसेच यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामसाहेब उर्फ आर.एम.चव्हाण,अमरावती जिल्हाध्यक्ष प्रकाश रावजी चव्हाण,अखिल भारतीय आदिवासी विकासचे जिल्हाध्यक्ष अशोकराव चव्हाण,उपाध्यक्ष शालिग्रामजी पवार,महिला सचिव उमाताई घासले,आदिवासी काँग्रेसचे उपाध्यक्ष तुळशीरामजी धुर्वे,भारतभाऊ थोरात,एड.तुषार थोरात,मार्गदर्शक राजकुमारजी गोबरे,निखिल चव्हाण,श्रीकृष्णराव सगणे,रजनीताई बेलसरे,फुलचंदजी कासदेकर,तसेच यावेळी अचलपूर,मेळघाट मधील तसेच चिखलदरा व मेळघाट येथील बहुसंख्य आदिवासी,बहुजन बांधव,दलित,अल्पसंख्यांक बांधव मोठ्यासंख्येंनी उपस्थित होते.