कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी- राज्यातील नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मुद्द्याला घेऊन रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार श्री श्यामकुमार बर्वे यांची आज (ता १८) विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली.
राज्यातील १६ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी जुनी पेन्शन या एकमेव मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरुन मतदान केले. काॅगेस नेते श्री राहूल गांधी व काॅगेस प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संसदेत व रस्त्यावर लढाई लढणार असल्याचे वेळोवेळी जाहीर केले याची आठवण करून देत आगामी संसदेच्या सत्रात *जुनी पेन्शन* चा आवाज बुलंद करावा अशी ही विनंती करण्यात आली. यावेळी शिक्षक मतदार संघात प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळावा, नवी शैक्षणिक धोरणातील त्रुटी आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी खासदार श्री श्यामकुमार बर्वे यांनी सर्व समस्या समजून घेत या विषयावर आपण सर्व जण एकत्र बसून विचार विमर्श करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय सचिव श्री खिमेश बढिये यांनी नवनियुक्त खासदार श्री श्यामकुमार बर्वे यांना जुनी पेन्शन ची टोपी घालून त्यांचे जुनी पेन्शन लढ्याच्या वतीने स्वागत केले. यावेळी विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पुष्पगुच्छ व जुन्या पेन्शनच्या मागणीचे निवेदन देऊन सत्कार करण्यात आला.
या भेटिप्रसंगी शिक्षक नेते मिलिंद वानखेडे नच्या नेतृत्वात नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, जुनी पेन्शन चळवळीचे समन्वयक माधव काठोके, टिईटी जिल्हा संघटक भिमराव शिंदेमेश्राम, तालुका संघटक श्री किशोर जिभकाटे, ग्रामीण जिल्हा सहसंघटक है कि नरेश तेल्कापल्लीवार, ग्रामीण जिल्हा संघटक श्री गणेश खोब्रागडे, संघटक श्री संजय आहाके, संघटक श्री अमित थटेरे, संघटक श्री गौरीशंकर साठवणे, संघटक श्री विलास उईके, मुख्याध्यापक संघाच्या संघटिका सौ एस. पी. धोटे, माध्यमिक शहर संघटक श्री सुनिल चन्ने प्रामुख्याने उपस्थित होते.