कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी तालुक्याला भुषण ठरलेल्या तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्थेची स्थापना स्वर्गीय कृष्णाजी वाळके. अॅड नारायण तांदूळकर. देवरावजी आसोले. संभाजी खडतकर. व कमलाकर मेंघर यांच्या स्वप्न पुर्तिचा गौरवशाली इतिहासाची शाक्ष देणारा असुन त्यांच्याच एकनिष्ठ पणाने पारशिवनी तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्था पारशिवनी तालुक्यातील शेतकरी हिताची खरेदी विक्री सहकारी संस्थां म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
यांच खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या अस्तित्वासाठी आज होत असलेल्या संचालक पदांच्या निवडणुकीत दोन पक्षात मोठी चुरस निर्माण झाली झालेली आहे.
पारशिवनी तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्था मध्ये ८०० मतदार असून १६० मतदार हे मय्यत आहे. म्हणजे ६४० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तयार आहेत. या सर्वसाधारण मतदार संघात असलेल्या मतदाराचे सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पक्षाचे आहे. तरी पण भाजपाला काही कार्यकर्त्यांच्या मतभेदांमुळे आपल्या मतदारांना एकनिष्ठ ठेऊन आपल्या पूर्वजांनी अतिशय परिश्रमपूर्वक शेतकरी हितासाठी स्थापना केलेली संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करावी लागते आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची अस्तीमा कायम ठेवण्यासाठी सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती व प्रकाशभाऊ वांढे. माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी. आमदार आशिष जैस्वाल यांच्या कुशल मार्गदर्शनात तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्था पारशिवनी वर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी भर उन्हातही परिश्रम घेण्यासाठी मतदारांच्या भेटी घेऊन मनधरणी करावी लागते आहे.
भारतीय शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार
राजेश मधुकर कडू. नेताजी देवरावजी खडतकर. सुरेश राघोजी भगत. दिलीप किसनराव वाळके. उत्तम चिंतामणराव सायरे. हे सर्व साधारण मतदार संघात रिंगणात आहेत. तर सौ. विमल विनायक जगनाडे व सौ. छाया लक्ष्मण येरखेडे ह्या महिला राखीव गटात रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय गटात चंद्रभान नामदेवराव इंगोले व कंचनराव खेमगिरजी गिरी हे भटक्या जाती /विमुक्त जमाती गटात उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. तर अनु. जाती – जमाती गटातिल अरुण भानुदास लांजेवार हे अविरोध निवडून आले आहेत.
शेतकरी सहकार पॅनलचे उमेदवार
चंद्रशेखर श्रीरामजी उपासे. रविंद्र आनंदराव काढे. राहुल निरंजन पहाडे. विरव्यकटराव सत्यनारायण वाकलपुडी. भगवान गुंडेराव वांढे. हे काॅग्रेसच्या शेतकरी सहकार पॅनलचे उमेदवार सर्व साधारण मतदार संघात रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय गटात गोविंद नामदेवजी कापसे. तर भटक्या जाती / विमुक्त जमाती गटात मानिकचंद श्रावण अमृते व महिला राखीव गटात सौ. वंदना चंद्रभान चकोले ह्या रिंगणात आहेत.
अविरोध निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार
आनंदराव काकडे. पुरुषोत्तम जवंजाळ. उमाजी बुरडे. शेषराव भलावी. रेवा भुजाडे. हे ५ उमेदवार अगोदरच अविरोध निवडून आले आहेत.
काँग्रेसला बहुमता करिता हवे ३ उमेदवार ला विजयी करायचे आहे.
पारशिवनी तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्था मध्ये एकुण १५ संचालक निवडून द्यायचे आहे. पण निवडणूक पुर्वीच काॅग्रेसचे ५ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ता काबीज करण्यासाठी फक्त ३ उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीचे माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक व चंद्रपालजी चौकसे यांच्या कुशल मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष दयाराम भोयर. अशोकराव चिखले. श्रीधरजी झाडे महासचिव. राजुभाऊ कुसुंबे शिक्षण सभापती. प्रकाश डोमकी माजी सरपंच. सौ. अर्चनाताई भोयर जिल्हा परिषद सदस्या. सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी. उपसभापती करूणाताई भोवते. माजी उपसभापती चेतन देशमुख. सौ. निकिताताई भारद्वाज. सौ. तुलसीताई दियेवार. सदिप भलावी. कस्तुरचंद पालीवाल अध्यक्ष नरेंद्र जिनिंग. सिवहरी भड उपाध्यक्ष नरेंद्र जिनिंग. दिपक भोयर. डुमनजी चकोले. सिध्दार्थ खोब्रागडे. विठ्ठल पंजाबराव वडस्कर. आदी सह निष्ठावान कार्यकर्ते यश संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करित आहे.
आजी. माजी आमदाराची मतभिन्नता काँग्रेस साठी सुवर्ण संधी
पारशिवनी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत ५०० पेक्षा अधिक मतदार हे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते व मतदार आहेत. त्यामुळे या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहील हे जरी खरे असले तरी.
आजी. माजी आमदाराचे मतभेद चव्हाटय़ावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. व यांच मतभेदांचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक व चंद्रपालजी चौकसे यांनी कुशलता पुर्वक मोर्चेबांधणी करीत सदर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व अंनत काळापासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत आपली सत्ता स्थापन करण्याचा संकल्प करूण पक्षसंघटना अधिक मजबूत व कणखर करून पक्षाचे ध्येय धोरण गाव खेड्यातील प्रत्येक व्यक्ती प्रर्यत पोहचवून विजय संपादन करण्याचा प्रबळ संकल्प केला आहे. पण संकल्पपुर्तिचा विजय होईल काय हे मतमोजणी अंतीच कळणार.
स्वर्गीय कमलाकर मेंघर असते तर
पारशिवनी शहरातील पक्ष बांधनी व भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्वर्गीय कमलाकर मेंघर यांनी घेतलेले परिश्रम व सबका साथ सबका विकास या तत्त्वावर कार्यकर्ते यांची साथ घेऊन विरोधकांना ही भुरळ पाडणारे स्वर्गीय कमलाकर मेंघर यांच्या शब्दांला विरोधकही सन्मान देत होते. त्यामुळे या निवडणुका अविरोध निवडून व्हायच्याच. पण भाऊ नसल्याने पक्षांतर्गत गटबाजी वाढत असल्याचे चित्र आहे.
अखेर माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी प्रचारात घेतला सहभाग
माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अखेर मनमिळवनी करुन प्रचारासाठी रखरखत्या उन्हात संक्रिंय सहभाग घेतला असल्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटातील अस्वस्थता नाहीसी झाली आहे.
आता काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस चे सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न हे क्षणभंगुर ठरणार असल्याचे सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती यांनी स्पष्ट केले.