करोडो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार अफरातफर प्रकरणी ३ आरोपींना अटक..

 दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका 
          स्थानिक चिमूर शहरात राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिमूर र.न.८०३ आहे.या संस्थेतंर्गत चाचणी अंकेक्षणाला अनुसरून करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप माजी उपाध्यक्ष,माजी व्यवस्थाप व माजी क्लर्क यांच्यावर होता.
          या आरोपाला अनुसरून चिमूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती व तक्रारीवरून सदर आरोपींवर विविध भांदवी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
           आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी अनेक ठिकाणी निवेदने देण्यात आले होते व निवेदनाला अनुसरून चिमूर तहसील कार्यालया समोर साखळी उपोषण आजपर्यंत सुरू होते.आरोपींना चिमूर पोलिसांनी अटक करताच साखळी उपोषण स्थगित करण्यात आले.
      आज सकाळी माजी उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे,माजी व्यवस्थापक मारोती पेंदोर,माजी क्लर्क अमोल मेहरकुरे यांना गुन्हे शाखा चंद्रपूरच्या विशेष पथकांनी व चिमूर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरु केला.
             चंद्रपूर पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी हे सदर चिमूर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत.

               रविंद्र सिंह परदेशी

            पोलिस अधीक्षक चंद्रपूर..

              मनोज गभणे

            पोलिस निरीक्षक

          पोलिस स्टेशन चिमूर..