दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
प्रेम कोणत्या वयात होईल व प्रेम प्रकरणातंर्गत काय घटना घडतील हे सांगणे अवघड आहे.
असेच एक मन हेलावून टाकणारे गंभीर प्रेम प्रकरण नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलिस स्टेशन अंतर्गत उघडकीस आले.
प्रेम प्रकरणातील अल्पवयीन मुलगा हा सातव्या वर्गात शिकणारा आहे तर अल्पवयीन मुलगी आठव्या वर्गात शिकणारी आहे.
अल्पवयीन मुलगी ही मुलाच्या बहिणीची मैत्रीण होती यामुळे घरी येणे जाणे सुरू होते.
घरी येण्याजाण्याच्या प्रसंगानुरूप वेळेत सदर दोघांचे प्रेम फुलले व प्रेमाचे रुपांतर शारिरीक व लैंगिक संबंधात आले.
घरी कुणी नसताना दोघेही मुलाच्या घरी शारिरीक व लैंगिक संबंध प्रस्थापित करायचे.या संबंधातून मुलीला गर्भधारणा झाली.
मुलींच्या पोटात दुखायला लागल्याने तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेण्यात आले.तपासणीअंती ती चार महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
विश्वासात घेऊन मुलीला विचारले असता सदर प्रेमीक मुलाचे नाव तिने सांगितले.
सदर मुलाला मौदा पोलिसांनी अटक केली असून त्याला बालनिरिक्षणगृहात पाठविण्यात आले आहे.