अमरावतीच्या क्षितिज गुरभेलेने पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा केली उत्तीर्ण…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

    केंद्रीय लोक सेवा आयोगाने १६ एप्रिल २०२४ रोजी २०२३ च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यामधे अमरावती येथील २४ वर्षीय क्षितिज गुरभेले याने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय आणि केवळ स्वयंअभ्यासाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात ४४१ रँकसह या महत्त्वपूर्ण परीक्षेत यश संपादन करून चमकदार कामगिरी केली आहे. 

          त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्यांचल अकॅडमी भोपाल येथून झाल्यानंतर त्याने २०२२ मध्ये, आय आय टी रुरकी मधून बि. टेक (प्रोडक्शन & इंडस्ट्रीज) ची पदवी प्राप्त केली, त्यानंतर तो अमरावती येथे आपल्या पालकांसह राहत असताना नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होता. त्यांचे वडील संजय गुरभेले हे बीएसएनएल अमरावतीमध्ये मुख्य लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि आई सुनीता गृहिणी आहेत. गुरभेले परिवार मूळचे नागपूरचे असून नोकरीनिमित्त ते पूर्वी भोपाल येथे वास्तव्याला होते आणि सद्या शांतीनगर अमरावती येथे वास्तव्याला आहे.

        निकाल लागल्यानंतर मुलगा आई आणि बहिणीसह वडिलांच्या कार्यालयात पोहोचला, अचानक संपूर्ण कुटुंब पाहून वडिलांनी त्याला येण्याचे कारण विचारले आणि मुलगा म्हणाला.

        “बाबा, तुम्हाला कोणीही वरिष्ठ अधिकारी भेटायला आला तर तुम्ही तुमच्या खुर्चीवरून उठून उभे राहीले पाहिजे.”

         हे ऐकून वडील आश्चर्यचकित झाले आणि आनंदाने आपल्या मुलाला मिठी मारली. कार्यालयातील सहकाऱ्यांनी हा भावनिक क्षण अनुभवला.

         क्षितिजचे हे यश केंदीय लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी करणाऱ्या अमरावतीकरांना अभिमानास्पद व खूपच प्रेरणादायी बाब आहे.

      आपल्या मित्राचा मुलगा केंदीय लोकसेवा आयोगाच्या पास झाल्याचे कळताच सुरेश दांडगे यांनी साईनगर परिसरातील विविध मंडळाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन संजय गुरभेले यांचे थेट घर गाठले व त्याला प्रत्यक्ष शुभेछ्या दिल्या.

            त्यांचे समवेत रविंद्र चवरे, भिमराव गायकवाड, देवा शेंडे, सुरज मंडे, सतिश नाईक, प्रकाश इंगोले, देवळेकर यांचेसह नालंदा बुध्द विहार पुर्वा कॉलनी साईनगर, विश्वशांती बुध्दविहार आकोली, संबोधी बुध्द विहार फॉरेस्ट कॉलनी, भिमज्योत सांस्कृतीक क्रिडा मंडळ साईनगर, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, सानेगुरुजी नगर, संत कबिरा मानवता समिती म्हाडा कॉलनी, यशसिध्दी महार रेजिमेंट माजी सैनिक संघटना, अमरावती यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्याच्या या यशाबद्दल त्याचे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.