“काल ( 18 /04 / 2024 गुरुवारी ) EVM हटविण्याचे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे किंवा EVM आणि VVPAT च्या पर्चीचे 100% तुलनात्मक ( क्रॉस चेकिंग करून ) मॅचिंग करूनच निकाल घोषित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित होते……..
परंतू ,तसे न होता जणूकाही सर्वोच्च न्यायालयाच्या दोन्ही न्यायमूर्तीनी ( बेंचनी ) सुरुवातीपासूनच मनात दृढनिश्चयच करून ठेवला होता की,काहीही झाले तरी……..
EVM हटवायची नाही…………!
काल दिवसभर जी बहेश झाली त्यातून हे निष्कर्ष निश्चितच जाणवले……
यामध्ये,याचिकाकर्त्यांच्या अनेक मुद्य्यांना न्यायालयाने खोडून टाकले, त्यामध्ये इतर देशात EVM चा वापर होत नाही म्हणून आमच्याकडे नको हा मुद्दा खोडताना आमच्या मतदारांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे म्हणून हा मुद्दा खोडून काढला…..!
इथे प्रश्न लोकसंख्येचा नाही….इथे प्रश्न लोकशाही वाचविण्याचा आहे. लोकशाहीत लोकांची इच्छाच सार्वभौम असते……….
कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ,न्यायमंडळ आणि माध्यमे ही व्यवस्था लोकांसाठीच लोकशाहीत निर्माण होत असते. या व्यवस्थेसाठी लोकं नसतात……..
या EVM च्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संघटना, विशेषतः सर्वोच्च न्यायालयातील वकिलांचा संघ रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई शेवटपर्यंत लढली…..
जनता सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढली……..
परंतू,न्यायालयाने या सर्व प्रयत्नांना केराची टोपली दाखविली….!
असं का या देशात घडलं असेल…?
या प्रश्नांचे उत्तर शोधत असतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या देशावर या व्यवस्थेला पुन्हा एकदा…..
“मनुवाद,…..
लादायचा आहे…….!
या होणाऱ्या शेवटच्या निवडणुका केवळ औपचारिकतेचा भाग आहे.तसे EVM ला भाजपवादी सेटिंग करून तयार आहे.कोणतेही बटण दाबन्याचा अवकाश,की 400 पारचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाहीत. तेंव्हा आता जनतेलाचा ( आपल्यालाच ) या विरोधात काही पाऊल उचलून…..
— लोकशाही व संविधान..
यांना ICU मधून बाहेर काढण्यासाठी,मनुवाद्याच्या विरोधात एका दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची तयारी प्रत्येक संविधानवादी आणि लोकशाहीवादी भारतीय नागरिकांची आहे…….
अन्यथा………
( या लेखाचा उत्तरार्ध उद्याच्या भागात……)
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर,:- 7875452689